Home /News /national /

घरून निघाली वरात, अर्ध्या रस्त्यातच कोरोना रिपोर्ट घेऊन आले अधिकारी आणि...

घरून निघाली वरात, अर्ध्या रस्त्यातच कोरोना रिपोर्ट घेऊन आले अधिकारी आणि...

लग्नासाठी वरात घेऊन नवरा मुलगा निघाला आणि रस्त्यातच त्याला वैद्यकिय अधिकाऱ्यांनी रोखलं.

    अमेठी, 20 जून : उत्तर प्रदेशमधील अमेठी जिल्ह्यात कोरोना संसर्गाशी संबंधित एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. लग्नासाठी वरात घेऊन नवरा मुलगा निघाला आणि रस्त्यातच त्याला वैद्यकिय अधिकाऱ्यांनी रोखलं. एकच गोंधळ उडाल्यानंतर कळलं की, वराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळं अर्ध्या रस्त्यातूनच वरात परतली. आता वराच्या वडिलांसह 10 जणांना गौरीगंज जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे. शुक्रवारी संध्याकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये अमेठीतील नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. सर्व दिल्लीहून आले होते. यातील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या तरुणाचे शुक्रवारी लग्न होते. सदर युवकाने 16 जून रोजी कोरोना चाचणी केली. शुक्रवारी संध्याकाळी त्याचा कोरोना रिपोर्ट आला. तोपर्यंत त्याची वरात निघाली होती. वाचा-कोरोनाच्या लढ्यात व्यापाऱ्याचं योगदान; कोरोनाग्रस्तांसाठी दिली 19 मजली इमारत प्रशासनानं रोखली वरात तरुणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अधिकारी त्वरित कारवाईस लागले. प्रशासनाने आपली सक्रियता दर्शवित वरात थांबवली. वर आणि काही वऱ्हाड्यांना आधीच सोडले होते. वैद्यकीय पथक आल्यावर त्यांना कोरोना पॉझिटिव्ह वर सापजला नाही. या संदर्भात अमेठीचे सीएमओ राजेश मोहन श्रीवास्तव म्हणाले की, वरात आधीच निघाली होती. वराचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर लग्नाच्या मंडपात वराला गाठून त्याला थेट रुग्णालयात दाखल केले. वाचा-भारतात कोरोनाग्रस्तांना दिलं जाणार 'हे' औषध; शरीरात व्हायरसचं संक्रमण रोखणार कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ उत्तर प्रदेशात आणखी 19 मृत्यूंसह शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या 500 पेक्षा जास्त झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत एकाच दिवसात सर्वाधिक 817 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यूपीचे अतिरिक्त मुख्य सचिव (वैद्यकीय व आरोग्य) अमित मोहन प्रसाद म्हणाले की, राज्यात संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 6092 आहे तर 9995 लोकं निरोगी होऊन घरी परतले आहेत. वाचा-धोका वाढला! कोरोनाचा वेग सामूहिक संक्रमणाच्या दिशेनं, तज्ज्ञांची माहिती
    First published:

    Tags: Corona, Corona virus, Corona virus in india

    पुढील बातम्या