अमेठीत खळबळजनक घटना, स्मृती इराणींच्या माजी सचिवाची गोळ्या झाडून हत्या!

अमेठीत खळबळजनक घटना, स्मृती इराणींच्या माजी सचिवाची गोळ्या झाडून हत्या!

उत्तर प्रदेशमधील अमेठीमध्ये शनिवारी रात्री खासदार स्मृती इराणी यांच्या माजी सचिवाची हत्या गोळी झाडून हत्या करण्यात आली.

  • Share this:

अमेठी, 26 मे: उत्तर प्रदेशमधील अमेठीमध्ये शनिवारी रात्री खासदार स्मृती इराणी यांच्या माजी सचिवाची हत्या गोळी झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जामो पोलीस ठाण्याच्या परिसरात बरौलिया गावात सुरेंद्र सिंह यांची अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली.

लोकसभा निवडणुकीचा निकाल तीनच दिवासांपूर्वी लागला होता. यात इराणी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच अमेठी मतदारसंघ चर्चेत होता. त्यानंतर इराणी यांच्या विजयामुळे तो पुन्हा चर्चेत आला. आता निकालानंतर सिंह यांच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. सुरेंद्र सिंह घराबाहेर झोपले होते. तेव्हा अज्ञात व्यक्तींनी त्यांची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी रात्री सुरेंद्र सिंह जेव्हा घराबाहेर झोपले होते तेव्हा त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या सिंह यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचार करुन डॉक्टरांनी त्यांना लखनऊ येथील रुग्णालयात नेण्यास सांगितले. लखनऊला घेऊन जाताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बारौलिया गावात खळबळ उडाली आहे. या घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांशी चर्चा करुन हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलीस छापे टाकत आहेत.

सिंह यांच्या हत्येमुळे बारौलिया गावात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

मोदींनी नवनिर्वाचित खासदारांना काय दिला सल्ला? या आणि इतर महत्त्वपूर्ण 18 घडामोडी, पाहा VIDEO

First published: May 26, 2019, 8:42 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading