अमेठी,ता.17 एप्रिल: काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सध्या अमेठीच्या दौऱ्यावर आहेत. तिथल्या एका शाळेच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले. कार्यक्रमानंतर विद्यार्थिनींनी आपले खासदार असलेल्या राहुल गांधींना विविध प्रश्न विचारले, त्यावर त्यांचं फक्त एकच उत्तर होतं तुम्ही योगी आणि मोदींना विचारा.
एका मुलीनं राहुल गाधींना अमेठीत रस्ते,वीज,पाणी या मुलभूत सुविधा का नाहीत? असा प्रश्न विचारला त्यावर राहुल गांधी अस्वस्थ झाले. या सुविधा पुरवण्याचं काम हे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचं आहे. मी लोकसभेचा खासदार असून कायदा करणं हे माझं काम आहे असं राहुल गांधी यांनी त्या मुलीला समजावून सांगितलं.
राहुल गांधींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक राहुल गांधींना प्रश्न विचारत आहेत. उत्तर प्रदेश आणि देशात दिर्घकाळ काँग्रेसचं शासन आहे. तर अमेठी हा गेली अनेक दशकं काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. राजीव गांधी, सोनिय गांधी आणि आता राहुल गांधींनी दिर्घकाळ अमेठीचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळं किमान साध्या सुविधाही अमेठीत का निर्माण होऊ शकल्या नाहीत असा प्रश्न लोक सोशल मीडियावर विचारत आहेत.
#WATCH: Rahul Gandhi interacts with school students in Amethi, on being asked about law implementation in villages, says. 'Ye aap Modi ji se puchiye', on being asked about Amethi, says, 'Amethi ko toh Yogi ji chalate hain.' pic.twitter.com/jmi8T6xO2G
— ANI UP (@ANINewsUP) April 16, 2018
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amethi, Congress, Narendra modi, Rahul gandhi, Rajiv gandhi, Yogi Aadityanath