अमेठी : राहुल गांधींवर नवं संकट, रद्द होऊ शकते उमेदवारी!

अमेठी : राहुल गांधींवर नवं संकट, रद्द होऊ शकते उमेदवारी!

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे.

  • Share this:

अमेठी, 20 एप्रिल: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे. अमेठीमधील जिल्हाधिकारी कार्यालयात अपक्ष उमेदवार ध्रुवलाल आणि बहुजन मुक्ती पक्षाचे उमेदवार अफजाल वारिस यांनी राहुल गांधींच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत त्यांचा अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे. ध्रुवलाल आणि वारिस यांनी घेतलेल्या आक्षेपानुसार राहुल गांधी यांनी अर्जावर जो स्टॅम्प लावला आहे तो दिल्लीचा आहे. प्रत्यक्षात तो अमेठीचा असला पाहिजे. तसेच राहुल गांधी यांनी शैक्षणिक पात्रतेबाबत हेरफेर आणि प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली नसल्याचा आरोप ध्रुवलाल यांनी केला आहे.

ध्रुवलाल आणि वारिस यांनी राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी भरलेल्या उमेदवारी अर्जात शैक्षणित पात्रतेबाबत पूर्ण माहिती दिली नाही. हा एक प्रकारचा धोका असल्याचे वारिस यांच्या वकिलांनी म्हटले आहे. इतक नव्हे तर प्रतिज्ञापत्रात स्थिर संपत्तीबाबतचा रकाना रिकामा सोडला आहे. राहुल यांनी एका कंपनीची नोंदणी करताना स्वत:ला ब्रिटनचे नागरिक असल्याचे म्हटले होते. त्यामुळे ते भारतीय नागरिक नाहीत, असा दावा ध्रुवलाल यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी खोटी कागदपत्रे सादर करुन निवडणूक अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचे ध्रुवलाल यांनी म्हटले आहे.

दरम्यान ध्रुवलाल आणि वारिस यांचे म्हणणे ऐकण्यासाठी जिल्हा निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना 22 एप्रिल रोजी 11 वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. यासंदर्भातील एक पत्र जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केले आहे.

VIDEO: ...तर देशात निवडणुकीची गरजच काय?- उदयनराजे

First published: April 20, 2019, 3:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading