जबरदस्त ऑफर! जेवताना, खाताना मोबाईल बाजूला ठेवलात तर इथे मिळेल फ्री पिझ्झा

जबरदस्त ऑफर! जेवताना, खाताना मोबाईल बाजूला ठेवलात तर इथे मिळेल फ्री पिझ्झा

पिझ्झा खाताना मोबाईलचा वापर टाळा आणि पिझ्झा फ्री मिळवा अशी एका रेस्टॉरंटनं ऑफर दिली आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 11 जून : मोबाईल हा आपल्या जीवनाचा आता अविभाज्य घटक झाला आहे. मोबाईलनं आपली जीवन व्यापून टाकलं आहे असं म्हटलं तर काहीही वावगं ठरून नये. अगदी जेवताना देखील मोबाईलचा वापर सर्रासपणे केला जातो. त्यामुळे अनेक वेळा घरचे देखील ओरडतात. पण, पिझ्झा खाताना मोबाईलचा वापर एकदाही न केल्यास तुम्हाला पिझ्झा फ्री दिला जाईल अशी ऑफर तुम्हाला एखाद्या रेस्टारंटनं दिल्यास? अमेरिकेतील पिझ्झेरिया रेस्टारंटनं ही ऑफर दिली आहे. अमेरिकेतील चॅनल फॉक्स न्यूजनं याबाबतची बातमी दिली आहे.

कॅलीफोर्नियामधील पिझ्झोरिया रेस्टारंटनं ग्राहकांनी पिझ्झा खाताना स्मार्ट फोनचा वापर न केल्यास पिझ्झा मोफत देणार असल्याची घोषणा केली आहे. केवळ घोषणा करून हे रेस्टारंट थांबलं नाही तर, त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आली. किमान चार लोकांच्या ग्रुपला ही ऑफर दिली जात आहे. या योजनेला टॉक टू एव्हरीवन असं नाव देखील देण्यात आलं आहे.

Indian Air Forceच्या बेपत्ता AN-32 विमानाचे अवशेष अखेर 9 दिवसांनी सापडले

...फ्री पिझ्झा

एका गटामध्ये किमान चार लोक असावेत. शिवाय, सर्वजण आपला मोबाईल फोन हा लॉकरमध्ये देखील ठेवू शकतात. पिझ्झा खाताना तुम्ही फोनचा वापर एकदाही न केल्यास मिळणारा पिझ्झा तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. तसंच हा पिझ्झा तुम्ही दान देखील करू शकणार आहात.

जेवताना मोबाईलचा फोनचा वापर कमी करून परस्परांमधील संवाद वाढवण्यासाठी हा अनोखा फंडा वापरल्याचं रेस्टारंटनं आपल्या फेसबुक पेजवर म्हटलं आहे. तसंच तुम्हाला आता पिझ्झा नको असल्यास पुढील वेळी तुम्हाला पिझ्झा मिळू शकतो. तुम्हाला पिझ्झा नको असल्यास तो दान देखील करता येणार असल्याचं रेस्टारंटनं म्हटलं आहे. पिझ्झा दान करण्यासाठी तुम्हाला रेस्टारंट देखील मदत करणार आहे.

बिग बॉसमधून मैथिली जावकरला कोणत्या कारणामुळे बाहेर पडावं लागलं?

First published: June 11, 2019, 4:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading