RSS नॉर्वेच्या दहशतवाद्याचा प्रेरणास्रोत, अमेरिकन पत्रकाराचा दावा

अमेरिकेत हाउडी मोदी कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या पत्रकाराने दावा केला आहे की, नॉर्वेत 77 लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दहशतवाद्यानं आरएसएसकडून प्रेरणा घेतली.

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2019 10:49 AM IST

RSS नॉर्वेच्या दहशतवाद्याचा प्रेरणास्रोत, अमेरिकन पत्रकाराचा दावा

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेतील ह्यूस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला एका अमेरिकन पत्रकाराने विरोध केला होता. आता त्याने दावा केला आहे की, नॉर्वेत दहशतवादी हल्ला करणाऱ्याने भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रेरणा घेतली होती. याबाबतचे वृत्त द टेलिग्राफने दिलं आहे. हाऊडी मोदी कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या कॅलिफोर्नियातील पीटर फ्रेडरिक या पत्रकाराने म्हटलं होतं की, भारताच्या पंतप्रधानांचे स्वागत केलं तर ते गुन्ह्यात भागिदार होतील.

द टेलिग्राफने दिलेल्या बातमीनुसार फ्रेडरिकने असा दावा केला की, नॉर्वेतील दहशतवादी अँडर्स ब्रेविकने एक घोषणापत्र दिलं होतं. त्यात त्याने जगभरातली कट्टरपंथी आणि राष्ट्रवादी संघटनांकडून कशी प्रेरणा मिळते ते सांगितलं होतं. ब्रेविकनं भारतातील आरएसएसकडे इशारा केला होता.

फ्रेडरिकने म्हटलं की, ब्रेविकने आरएसएसच्या हिंदू राष्ट्रवाद आणि भारताला हिंदू राष्ट्र करण्याच्या ध्येयाचं कौतुक केलं होतं. आरएससचा प्रभाव रस्त्यावर दिसून येतो आणि मुस्लिमांविरुद्ध हिंसा करतात असं कारण ब्रेविकनं दिलं होतं. श्वेत वर्णीयांचं आणि आरएसएसचं ध्येय एकच आहे. त्यांना एकमेकांकडून शिकलं पाहिजे आणि एकमेकांना सहकार्य करायला हवं असंही ब्रेविकने म्हटल्यांचा दावा फ्रेडरिकने केला आहे.

आरएसएसबद्दल एवढंच वक्तव्य करून फ्रेडरिक थांबला नाही तर त्याने आऱएसएस फॅसिस्ट असल्याचं म्हटलं आहे. त्याला हिटलरशी जोडताना म्हटलं आहे की, ज्यावर्षी हिटलरचे माइन काम्फ प्रकाशित झालं त्याच वर्षी 1925 मध्ये आरएसएसची स्थापना झाली होती. त्यांनी नाझींकडून प्रेरणा घेतली आणि त्याचाच परिणाम नरेंद्र मोदी असल्याचं फ्रेडरिकने म्हटलं.

पंतप्रधान मोदींना विरोध करताना फ्रेडरिकने 2002 च्या गुजरात दंगली प्रकरणी मोदी दोषी असल्याचं म्हटलं. तसेच ह्यूस्टनमधील नगरसेवकांना भारतीय नेते आणि आरएसएसची माहिती देणारी एक फाइलही दिली. त्यावेळी फ्रेडरिक म्हणाला की, मोदींचे हात रक्ताने माखलेले आहेत. जे लोक त्यांच्या स्वागताला जातील ते देखील गुन्ह्याचे भागिदार होतील.

Loading...

साताऱ्यातील उमेदवारीबाबत पृथ्वीराज चव्हाण घेणार दोन दिवसांत निर्णय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: RSS
First Published: Sep 30, 2019 10:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...