VIDEO : नॅशनल हायवेवर ट्रकमधून उडत होत्या नोटा, लोकांनी लुटून नेले 68 लाख रुपये

एका हायवेवर ट्रकमधून नोटा उडू लागल्या त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. ट्रकमधून अमेरिकन डॉलर सगळीकडे उडू लागले तेव्हा ते गोळा करण्यासाठी एकच झुंबड उडाली.

News18 Lokmat | Updated On: Jul 11, 2019 08:23 PM IST

VIDEO : नॅशनल हायवेवर ट्रकमधून उडत होत्या नोटा, लोकांनी लुटून नेले 68 लाख रुपये

अटलांटा (अमेरिका), 11 जुलै : अमेरिकेमधल्या एका नॅशनल हायवेवर एका ट्रकमधून नोटा उडू लागल्या त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे.डब्लूएसबी रेडिओने दिलेल्या बातमीनुसार, ट्रकमधून अमेरिकन डॉलर सगळीकडे उडू लागले तेव्हा ते गोळा करण्यासाठी एकच झुंबड उडाली.

Loading...

अटलांटामध्ये एका गजबजलेल्या हायवेवर ही घटना घडली. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका ट्रकचं दार लोकांनी ठोठावलं तर त्यातून अचानक अमेरिकन डॉलर उडू लागले.

या हायवेने वेगात जाणारी वाहनंही इथे थांबू लागली. सगळं विसरून लोक या नोटा गोळा करू लागले.

'जय श्रीराम' म्हटलं म्हणून शिक्षिकेने मुलाला दिला मार

या ट्रकमधून तब्बल 68 लाख रुपये अशा पद्धतीने गायब झाले. जेव्हा त्याठिकाणी पोलीस पोहोचले तेव्हा सगळे जण तिथून पसार झाले. अशा पद्धतीने रस्त्यामध्ये पडलेले पैसे उचलणं हा गुन्हा आहे. या ट्रकमधून असे किती पैसे लंपास झाले याचा पोलीस हिशोब करत आहेत पण त्यांच्या मते, सुमारे 1 लाख डॉलर लंपास झाले असावेत. जर तुम्ही हे पैसे गोळा केले असतील तर ते परत करावे,असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

====================================================================================================

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचे नवे निर्णय जाहीर, या आहे 18 महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2019 08:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...