देशात कोरोनाचं थैमान असतानाच आला मान्सूनचा अंदाज, असा असेल पाऊस
देशात कोरोनाचं थैमान असतानाच आला मान्सूनचा अंदाज, असा असेल पाऊस
पाऊसमान चांगलं असंल तर सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यात राज्यातली बहुतांश धरणं भरून वाहू लागतात आणि सांगली, कोल्हापूरसारख्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते.
अल नीनोचा प्रभाव फारसा पडणार नाही त्यामुळे मान्सून चांगला असेल. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर जास्त पाऊस पडेल असाही अंदाज त्यांनी व्यक्त केलाय.
मुंबई 03 एप्रिल : देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. जगभर हाहाकार उडालाय. सगळा देश लॉकडाउन आहे. असं भयग्रस्त वातावरण असतानाच अमेरिकेच्या एका हवामानविषयक कंपनीने 2020 च्या मान्सूनचा अंदाज व्यक्त केलाय. यावर्षी भारतात सरासरीच्या 105 टक्के पाऊस होईल असा अंदाज IBM या कंपनीने व्यक्त केला आहे. 105 टक्के पाऊस हा चांगला समजला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता. यावर्षी मान्सून थोडा लवकरच येईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय.
भारतीय हवामान विभाग या महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या सुरूवातीला आपला अंदाज जाहीर करत असतो. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटीही अंदाज व्यक्त केला जातो. तो जास्त अचूक समजला जातो.
IBMने विविध घटकांचा अभ्यास करून हा अंदाज व्यक्त केला आहे. अल नीनोचा प्रभाव फारसा पडणार नाही त्यामुळे मान्सून चांगला असेल. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर जास्त पाऊस पडेल असाही अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या मालाचं प्रचंड नुकसान झालं. त्याआधी अतिपावसाने माल खराब झाला. त्यामुळे या अंदाजामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा...लॉकडाउनचा सर्वात मोठा चमत्कार! सकाळी क्षितिजाजवळ दिसलं कधीही न पाहिलेलं दृश्यLockdown च्या काळात किचनमधील हे पदार्थ वाढवतील तुमची इम्युनिटी!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.