S M L

VIDEO : अमेरिकेच्या राजपथावर ढोलताशाचा गजर!

अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाच्या संचलनात सहभागी झालेल्या मराठमोळ्या देव गर्जना ढोल ताशा पथकानं सर्वांची मने जिंकली.

News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2018 10:05 PM IST

VIDEO : अमेरिकेच्या राजपथावर ढोलताशाचा गजर!

वॉशिंग्टन,ता.6 जुलै : अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिन संचलनात भारतीय ढोल ताशाने मने जिंकली. जुलै ४ ला अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन साजरा झाला. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी. सी. ला त्यादिवशी अमेरिकेतील सर्वात मोठे संचालन असतं. यात देव गर्जना ढोल ताशा पथकाला सहभागी होण्याची संधी मिळाली. अशा परेडमध्ये सहभागी होण्याची देवगर्जनाची ही दुसरी वेळ आहे.या परेडमध्ये अमेरिकाभरातून ५००० वेगवेगळी पथके सामील होण्यासाठी धडपडत असतात. परंतु फक्त काही निवडक पथकांनाच यात सामील होण्याचा मान मिळतो.

गेल्या वर्षी देव गर्जना चा परेड मधील स्थान ११९ वे होते. या वर्षी देव गर्जना ला ४९ वे स्थानावर आघाडी मिळाली. या परेड ची कल्पना साधारण राजपथावरील २६ जानेवारीच्या संचालनाशी तुलना करून होऊ शकेल. देव गर्जना या एकमेव भारतीय ढोल पथकाला हा बहुमान मिळाला. हे पथक समीर मंगरूळकर, अभिजित पानसे व देव समीर मंगरूळकर यांनी 6 वर्षांपूर्वी सुरु केलं होतं.

कॉन्स्टिट्यूशन ऍव्हेन्यू वर जिथे हे संचालन असते तिथे विना सावलीचे ना थांबता वेगाने चालत ढोल ताशा लेझीम झांज ज झेंडे नाचवणे हे अतिशय जोखमीचे काम होते. पण कोणीही ना थकता हे काम फत्ते केले . वाटेत हजारोंच्या संख्येने दुतर्फा अमेरिकन नागरिक ढोल ताशाच्या ठेक्याचा खूप आनंद घेत होते व थिरकत होते.हेही वाचा...

 शिवसेना, मनसेचा विरोध डावलून बुलेट ट्रेनचं पहिलं टेंडर निघालं

 Buradi Case: भाटिया कुटुंबाला अज्ञात शक्तीने ग्रासलं होतं,महिला मांत्रिकाचा दावा 

Loading...

 शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, पीक विम्याचा मिळाला फक्त एक रूपया

मुख्यमंत्री हरले,माजी मुख्यमंत्री जिंकले ? 

 दारूच्या बाटल्यांमुळे विधान भवन परिसरात तुंबलं पाणी

नागपूर पाण्यात कुणामुळे गेलं? शिवसेनेचा भाजपला सवाल

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2018 10:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close