अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांना नरेंद्र मोदी जिंकणार हे आधीच माहिती होतं

भारतातल्या वातावरणाचा अंदाज आम्हाला आला होता. त्यामुळे नरेंद्र मोदीच जिंकतील अशी आम्हाला खात्री होती

News18 Lokmat | Updated On: Jun 13, 2019 10:25 PM IST

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांना नरेंद्र मोदी जिंकणार हे आधीच माहिती होतं

वॉशिग्टंन, 13 जून : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी मोठं वक्तव्य केलंय.  भारतातल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हेच जिंकणार हे आपल्याला आधीच माहिती होतं असं ते म्हणाले. मी आणि माझी टीम भारतातल्या निवडणुकांवर लक्ष ठेवून होते. तिथल्या वातावरणाचा अंदाज आम्हाला आला होता. त्यामुळे नरेंद्र मोदीच जिंकतील अशी आम्हाला खात्री होती असंही त्यांनी सांगितलं ‘इंडिया आइडियाज समिट’ या कार्यक्रमात ते बोलत होते. 24 जून पासून पॉम्पिओ भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत 'मोदी है तो मुमकीन है', अशी भाजपची घोषणा होती. आता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनीही या शब्दांत मोदींची स्तुती केली आहे. 'मोदी है तो मुमकीन है' असा विश्वास त्यांनीही दाखवला आहे.

अमेरिकेमध्ये पुढच्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत. लोकसभा निवडणुकीत 'आएगा तो मोदीही' ही घोषणा खूपच गाजली होती. त्याचप्रमाणे आता अमेरिकेतही 'आएगा तो ट्रम्पही' अशी घोषणा दिली जाते आहे.

मोदींच्या विजयाबद्द्लच्या घोषणा फक्त भारतातच नाही तर जगभरात गाजल्या हेच यावरून दिसतं.

एस. जयशंकर यांचीही स्तुती

Loading...

माइक पॉम्पिओ यांनी नवे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचीही प्रशंसा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी सुदृढ करण्याच्या दृष्टीने कसे प्रयत्न करतात हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे, असंही ते म्हणाले.

भारत आणि अमेरिकेच्या व्यापारविषयक परिषदेत पॉम्पिओ यांनी हे उद्गार काढले. ते 24 जूनला भारत दौऱ्यावर येत आहेत. भारताचे नवे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. मोदींना त्यांची खंबीर साथ आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मैत्रीचं नवं पर्व

भारत आणि चीन, अमेरिका या महासत्तांच्या मैत्रीचं नवं पर्व सुरू करण्यात एस. जयशंकर यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळेच पॉम्पिओ यांनी एस. जयशंकर यांची प्रशंसा केली.

माइक पॉम्पिओ हे भारतासोबतच श्रीलंका, जपान, दक्षिण कोरिया या देशांचाही दौरा करणार आहेत. त्यांचा हा आशिया दौरा भारताच्य दृष्टीने सर्वात महत्त्वाचा आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2019 10:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...