ट्रम्प म्हणतात, अमेरिकेतील दिवाळी महत्त्वाच्या सिद्धांताची आठवण करून देणारी

ट्रम्प म्हणतात, अमेरिकेतील दिवाळी महत्त्वाच्या सिद्धांताची आठवण करून देणारी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील भारतीयांसोबत दिवाळी साजरी करत शुभेच्छा दिल्या.

  • Share this:

वॉशिंग्टन, 26 ऑक्टोबर : सध्या भारतात दिवाळी सणाचा उत्साह आहे. देशभरात सण साजरा केला जात आहे. फक्त देशातच नाही तर देशाबाहेरही दिवाळी साजरी केली जाते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेपिरेकील हिंदू, जैन, शिख आणि बौद्ध धर्मीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की संपूर्ण अमेरिकेता प्रकाशाचा हा सण साजरा केला जातो. देशाचा महत्वाच्या सिद्धांत असलेल्या धार्मिक स्वातंत्र्याची आठवण अमेरिकेतील दिवाळीमुळे होते असं ट्रम्प यांनी म्हटलं.

ओव्हलमधील कार्यालयात अमेरिकेतील भारतीय लोकांसोबत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिवाळी साजरी केली. भारत, अमेरिका आणि जगभरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बोलताना ट्रम्प म्हणाले की, संपूर्ण अमेरिकेत दिवाळी साजरी करणं आमच्या देशातील एक महत्वाचा सिद्धांत धार्मिक स्वातंत्र्याची आठवण करून देतो. हे सरकार संविधानाने दिलेल्या अधिकारांचे संरक्षण करते.

देशातील सर्व धर्मीयांना त्यांच्या प्रथा आणि विवेकानुसार पूजा करण्याचा अधिकार आहे असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ट्रम्प यांची पत्नी मेलानिया उपस्थित होत्या. या कार्यक्रमात प्रसिद्धी माध्यमांना प्रवेश देण्यात आल नव्हता.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, दिवाळीनिमित्त मेलानिया आणि मी प्रकाशाचा उत्सव साजरा करणाऱ्या लोकांना आनंदाने हा सण साजरा करण्यासाठी शुभेच्छा. अमेरिकेतील सर्व धर्मियांसाठी ही पवित्र वेळ असून अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय साजरा करण्याचा उत्सव आहे.

SPECIAL REPORT: सत्तेसाठी पक्षांतर करणाऱ्या 'या' नेत्यांना मतदारांनी दाखवला घरचा रस्ता

Published by: Suraj Yadav
First published: October 26, 2019, 12:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading