पाकिस्तानला पैसे न देता अमेरिका बांधतेय ही अजस्त्र भिंत!

पाकिस्तानला पैसे न देता अमेरिका बांधतेय ही अजस्त्र भिंत!

'अमेरिकेकडून मिळणाऱ्या मदतीचा पाकिस्तान दहशतवादासाठी उपयोग करतो.'

  • Share this:

वॉशिंग्टन 12 मे : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला देण्यात येणाऱ्या मदत निधीत अमेरिकेने मोठी कपात केला आहे. दरवर्षी अमेरिका या दोन देशांना अब्जावधी डॉलर्सची मदत करत असतो. मात्र आता हा पैसा अमेरिका मेक्सिको सीमेवरच्या भिंतीवर खर्च करणार असल्याची माहिती अमेरिकेचे काळजीवाहू संरक्षणमंत्री पॅट्रीक शॅनहन यांनी दिलीय.

दहशतवादाविरुद्धदाच्या लढाईसाठी अमेरिका दरवर्षी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला अब्जावर्धी डॉलर्सची मदत गेली कित्येक वर्ष करतोय. मात्र बदलत्या जागितक परिस्थित डोनाल्ड ट्रम्प यांनी ही मदत बंद केली. या मदतीचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. अमेरिकेचं जे उद्दीष्ट होतं ते साध्य होत नाही त्यामुळे या मदतीचा फायदा नाही असं अमेरिकेचं म्हणणं आहे.

पाकिस्तान या मदतीच्या जोरावर दहशतवादाला आळा न घालता त्यांना खतपाणी पुरवत असे. भारतानेही याबद्दल अमेरिकेला अनेकदा पुरावे दिले होते. डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर अमेरिकेच्या धोरणात अमुलाग्र बदल झाला. ही मदत बंद झाल्याने पाकिस्तानला दणका बसला आहे.

अमेरिकेचा शेजारी असलेल्या मेक्सिकोमधून दरवर्षी हजारो लोक अमेरिकेत घुसखोरी करत असतात. त्याचा ताण अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर आणि समाज जीवनावर होत असतो. या सीमेवरून ड्रग्जची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या सीमेवर भिंत उभारण्यात येईल असं आश्वासन ट्रम्प यांनी निवडणुकीच्या काळात दिलं होतं. अमेरिकेत 60 लाखांपेक्षा जास्त मेक्सिकन नागरिक राहत असून त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नाहीत.

सत्तेवर आल्यानंतर त्यांनी भिंत उभारण्याची घोषणा केली. 120 किलोमीटरची ही भिंत आणि सुरक्षा उपायोजना करण्यासाठी 21 बिलियन डॉलर्स खर्च होणार आहेत. त्यासाठी अमेरिकेने एक मोठा निधी उभारला आहे. त्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला देण्यात येणाऱ्या मदत निधीचा मोठा वाटा आहे.

First published: May 12, 2019, 6:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading