अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, 12 जणांचा जागीच मृत्यू

अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, 12 जणांचा जागीच मृत्यू

अमेरिकेतील वर्जिनिया परिसरात एक व्यक्तीनं केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 12 जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत.

  • Share this:

वॉशिंग्टन, 1 जून : अमेरिकेतील वर्जिनिया परिसरात एक व्यक्तीनं केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 12 जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराची ही घटना वर्जिनिया येथील सरकारी इमारतीत घडली आहे. म्युनिसिपल सेंटरमध्ये हा गोळीबार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारा व्यक्ती याच सेंटरमधील कर्मचारी होता. दरम्यान प्रत्युत्तराच्या कारवाईत पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला ठार देखील केलं. पण अद्याप आरोपीची ओळख पटू शकलेली नाही. शुक्रवारी (31 मे) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

एक पोलीस कर्मचारीदेखील जखमी  

गोळीबारादरम्यान एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला आहे. पण आरोपीनं गोळीबार नेमक्या कोणत्या कारणामुळे केला, याबाबतीच माहिती स्पष्ट होऊ शकलेली नाही. ही घटना घडल्यानंतर सतर्कता म्हणून शेजारील इमारतीदेखील रिकाम्या करण्यात आल्या. सध्या याप्रकरणाची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

VIDEO : कोयत्याने सपासप वार, राष्ट्रीय महामार्गावर तरुणाची हत्या

First published: June 1, 2019, 7:21 AM IST

ताज्या बातम्या