अमेरिका भारताला देणार 3 अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्र, उद्या होणार सर्वात मोठा संरक्षण करार

अमेरिका भारताला देणार 3 अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्र, उद्या होणार सर्वात मोठा संरक्षण करार

अत्याधुनिक हेलिकॉप्टर आणि शस्त्रास्त्र अमेरिका भारताला देणार आहेत. दोन्ही देशांमधला हा सर्वात मोठा संरक्षण करार आहे.

  • Share this:

अहमदाबाद 24 फेब्रुवारी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इथल्या मोटेरा स्टेडियममध्ये दीड लाख लोकांसमोर भाषण दिलं. 22 किलोमीटरचा रोड शो आणि साबरमती आश्रमातल्या भेटीनंतर ट्रम्प हे पत्नी मेलेनियासह स्टेडियमवर पोहोचले. तिथे गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत संरक्षण कराराची घोषणा केली. भारत आणि अमेरिकेतला हा सर्वात मोठा संरक्षण करार असून अमेरिका भारताला 3 अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्र देणार आहे. उद्या नवी दिल्लीत या करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. तर व्यापर कराराचेही संकेत ट्रम्प यांनी दिलेत. मात्र त्यावर अजुनही वाटाघाटी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.

अध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंड भरून कौतुक केलं. मोदी हे वाटाघाटीत अतिशय कठोर आहेत. ते आपली भूमिका सोडत नाहीत असंही ट्रम्प यांनी म्हटलंय. अत्याधुनिक हेलिकॉप्टर आणि शस्त्रास्त्र अमेरिका भारताला देणार आहेत. दोन्ही देशांमधला हा सर्वात मोठा संरक्षण करार आहे.

ट्रम्प यांच्या तोंडी रोमँटिक DDLJ चं नाव येताच मेलेनिया यांचा चेहरा खुलला

भारत गेली अनेक दशकं रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करतो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेसोबत भारताचे संरक्षण सहकार्य वाढत आहे. भारत आणि अमेरिकेत व्यापारी करार होण्याचीही शक्यता असून त्याच्या वाटाघाटी सुरू आहेत. भारत अमेरिकेच्या वस्तुंवर जास्त कर लावतो. मात्र अमेरिका भारताता कमी करांमध्ये वस्तू देतो. आता भारतानेही अमेरिकेच्या आयात वस्तूंवरचे कर कमी करावेत अशी अमेरिकेची मागणी आहे.

हेही वाचा...

VIDEO : ट्रम्प आणि मेलेनया यांनी साबरमती आश्रमात केली सूतकताई

VIDEO : ट्रम्प- मेलानिया स्वागतासाठी अहमदाबादच्या रस्त्यावर होती अभूतपूर्व गर्दी

First published: February 24, 2020, 3:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading