जमशेदपूर 03 फेब्रुवारी : झारखंड च्या जमशेदपुर पश्चिमी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बन्ना गुप्ता (Banna Gupta) हे निवडून आले आणि हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. गुप्ता यांना आरोग्यमंत्रालय मिळालंय. मंत्री झालेला आपला नेता पहिल्यांदाच मतदारसंघात आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वागताची जंगी तयारी करत मोठी रॅली काढली. मंत्र्यांच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीत एक अॅम्बुलन्स अडकली आणि त्यातल्या पेशंटचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल घडली. या घटनेमुळे झारखंडमध्ये राजकीय वादळ निर्माण झालं असून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
आरोग्यमंत्री गुप्ता यांच्या स्वागतासाठी शहरात काँग्रेसने सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं आणि रॅलीही काढली जाणार होती. गुप्ता यांचं शहरात आगमन झाल्यानंतर जोरदार आतषबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी मंत्र्यांच्या गाडीमागे आपल्याही गाड्या आणल्याने वाहनांचा ताफा आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे सगळा रस्ता जाम झाला.
हे पद झेपेल का?असं शिवसेनाप्रमुखांना वाटलं असतं, आठवणीने गहिवरले उद्धव ठाकरे
ट्राफिक जाम झाल्यामुळे वाहनांच्या लांब रांगाही लागल्या. या ट्राफिक जाममध्ये तब्बल पाच अॅम्बुलन्स अडकल्या. गर्दीमुळे त्यांना रस्ताच मिळाला नाही. काही तास अडकून पडल्यानंतर या अॅम्बुलन्सला रस्ता मिळाला. मात्र दुर्दैवाने त्यातल्या एका अॅम्बुलन्समधल्या पेशंटचा मृत्यू झाला. योग्य वेळेत ही अॅम्बुलन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचली असती तर त्याचा जीव वाचला असता असं सांगितलंय जातेय. त्यानंतर लोकांनीही तीव्र संताप व्यक्त केलाय.
या पेशंटच्या मृत्यूला काँग्रेसचे मंत्रीच जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केलाय. आरोग्यमंत्र्यांमुळेच जर पेशंटचा मृत्यू होत असेल तर त्यांची तातडीने हकालपट्टी करा अशी मागणीही भाजपने केलीय.
Published by:Ajay Kautikwar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.