मराठी बातम्या /बातम्या /देश /5 पैकी 3 किलो सोनं परत करत रचला प्रामाणिकपणाचा बनाव, अँब्युलन्स स्टाफने 2 किलो सोनं केलं लंपास पण...

5 पैकी 3 किलो सोनं परत करत रचला प्रामाणिकपणाचा बनाव, अँब्युलन्स स्टाफने 2 किलो सोनं केलं लंपास पण...

अपघातस्थळावरून दोन किलो सोनं चोरणाऱ्या अँब्युलन्स स्टाफला तेलंगणातील पेडापल्ली जिल्ह्यातील रामगुंडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून हे सोनं मिळालं आहे अशी माहिती रामगुंडाचे पोलीस आयुक्त व्ही. सत्यनारायण यांनी बुधवारी दिली

पुढे वाचा ...

  हैदराबाद, 25 फेब्रुवारी: अपघातस्थळावरून दोन किलो सोनं चोरणाऱ्या अँब्युलन्स स्टाफला तेलंगणातील पेडापल्ली जिल्ह्यातील रामगुंडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून हे सोनं मिळालं आहे अशी माहिती रामगुंडाचे पोलीस आयुक्त व्ही. सत्यनारायण यांनी बुधवारी दिली. ते म्हणाले, ‘ सरकारी इमर्जन्सी अँब्युलन्स 108 चा ड्रायव्हर आणि इमर्जन्सी मेडिकल टेक्नीशियन जी. लक्ष्मा रेड्डी याला आम्ही ताब्यात घेतलं असून, त्याच्याकडून 2.300 किलो वजनाचे सोन्याचे दागिने आम्ही जप्त केले आहेत. ’

  आंध्र प्रदेशातील गुंटूरचे के. श्रीनावस राव (55) आणि के. रामबाबू (45) , डी. संतोष, जी. संतोष हे चौघं सोन्याचे दागिने घेऊन तेलंगणातील विविध ठिकाणच्या ज्वेलर्सच्या ऑर्डर द्यायला चालले होते. पहाटेच्या वेळी मलयलापल्लीजवळ कार उलटून झालेल्या अपघातात श्रीनिवास आणि रामबाबू यांचा मृत्यू झाला तर इतर दोघं जखमी झाले. त्यांना मदतीसाठी आलेल्या 108 नंबरच्या अँब्युलन्समधील ड्रायव्हर आणि इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन जी. लक्ष्मा रेड्डी याने घटनास्थळी आलेल्या पोलिसांना 3.300 किलो सोनं सुपूर्द केलं. त्याने इतक्या प्रामाणिकपणे सोनं परत केलं यासाठी पोलिसांनी त्याचं कौतुकही केलं. पण नंतर मृतांच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केली की कारमध्ये एकूण 5.600 किलो सोनं होतं आणि 2.300 किलो सोनं हरवलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

  (हे वाचा-नागपूर हादरलं, 16 वर्षीय मुलीचे हातपाय बांधून बलात्कार, नराधम अटकेत)

  त्यानंतर पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आणि अँब्युलन्स ड्रायव्हरला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली तेव्हा त्याने गुन्हा कबूल करून 2.300 किलो सोनं पोलिसांना परत केलं. दुसऱ्या अँब्युलन्समधून कारचालक डी. संतोष आणि जी. संतोष या कारमधल्या इतर दोघांना करिमनगर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. त्यांच्याकडे मिळालेले 1 किलो सोन्याचे दागिने त्या अँब्युलन्समधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिले.

  (हे वाचा-पत्नीचा खून केला आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दिली बेपत्ता असल्याची तक्रार, अखेर..)

  व्ही. सत्यनारायण म्हणाले, ‘ या प्रकरणातील दागिन्यांची बिलं आणि त्याच्याशी संबंधित इतर गोष्टींचा पोलीस अधिक तपास करत आहेत. अपघातस्थळी पहिल्यांदा पोहोचणाऱ्या व्यक्ती, पोलीस, इमर्जन्सी मेडिकल कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे वागायला हवं. एखाद-दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या लोभीपणामुळे रुग्णांची अविरत सेवा करून अनेकांचे जीव वाचवणाऱ्यांच्या प्रतिमेला काळिमा फासला जातो.’

  First published:

  Tags: Hyderabad