संस्कृत राष्ट्रभाषा व्हावी अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा-मुरली मनोहर जोशी

संस्कृत राष्ट्रभाषा व्हावी अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा-मुरली मनोहर जोशी

जेव्हा हा प्रस्ताव मांडण्यात आला तेव्हा संविधान सभेतील मुस्लीम सदस्यांनीही या प्रस्तावाला अनुमोदन दिलं होते. त्यावेळी कुणीही ही ब्राह्मणांची भाषा आहे, असा आक्षेप घेतला नव्हता तर ही एकतेची भाषा अशीच त्या सर्वांची भावना होती असंही डॉ. जोशी म्हणाले

  • Share this:

नागपूर, 11 सप्टेंबर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी असं म्हणणं होतं. तसा प्रस्तावही त्यांनी संविधान सभेच्या बैठकीत मांडल्याचा दावा माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी यांनी केला आहे.

जेव्हा हा प्रस्ताव मांडण्यात आला तेव्हा संविधान सभेतील मुस्लीम सदस्यांनीही या प्रस्तावाला अनुमोदन दिलं होते. त्यावेळी कुणीही ही ब्राह्मणांची भाषा आहे, असा आक्षेप घेतला नव्हता तर ही एकतेची भाषा अशीच त्या सर्वांची भावना होती असंही डॉ. जोशी म्हणाले. डॉ. श्रीधर वर्णेकर यांची जन्मशताब्दी महोत्सव समिती आणि अभ्यंकरनगर नागरिक मंडळाच्या वतीने सायंटिफिक सोसायटीच्या सभागृहात आयोजित मानवंदना कार्यक्रमात ते बोलत होते. देशात जोपर्यंत संस्कृत भाषेचा अभ्यास अनिवार्य केला जाणार नाही, तोपर्यंत भारत ब्रिटिशांच्या वसाहतवादाच्या मानसिकेतून पडणार नाही. असं डॉ. जोशी यांनी यावेळी सांगितलं

First published: September 11, 2017, 1:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading