S M L

दोन हत्याप्रकरणातही राम रहीमला होणार शिक्षा, ड्रायव्हर साक्ष देण्यासाठी आला पुढे

डेरा सच्चा सौदाचा व्यवस्थापक रंजीत आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणाच्या सुनावणी दरम्यान खट्टा सिंह यांनी साक्ष देण्यासाठी याचिका दाखल केलीये.

Sachin Salve | Updated On: Sep 16, 2017 06:20 PM IST

दोन हत्याप्रकरणातही राम रहीमला होणार शिक्षा, ड्रायव्हर साक्ष देण्यासाठी आला पुढे

16 सप्टेंबर : साध्वी लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या अडचणीत आणखी भऱ पडणार आहे. दोन हत्याच्या प्रकरणात त्याचा ड्रायव्हर खट्टा सिंह साक्ष देण्यासाठी पुढे आलाय.

पंचकुला सीबीआय कोर्टाने डेरा सच्चा सौदाचा व्यवस्थापक रंजीत आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणाच्या सुनावणी दरम्यान खट्टा सिंह यांनी साक्ष देण्यासाठी याचिका दाखल केलीये.

विशेष म्हणजे याच प्रकरणात 2012 मध्ये खट्टा सिंहने साक्ष देण्यास नकार दिला होता. त्यावेळी राम रहीमच्या गटाकडून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे आपण साक्ष देऊ शकलो नाही असा खुलासा सिंह यांनी केला. आता राम रहीम तुरुंगात गेलाय. त्यामुळे साक्ष देण्यास तयार असल्याचंही सिंह यांनी स्पष्ट केलं. सीबीआय कोर्टाने आता या प्रकरणी 22 सप्टेंबरला सुनावणी ठेवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 16, 2017 06:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close