नवी दिल्ली, 29 जून : कोरोनामुळे (Coronavirus) संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली. अशात अनेक कंपन्यांनी नोकऱ्या देणं बंद केलं आहे. पण जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीने भारतीयांसाठी नोकरीची संधी उपलब्ध केली आगे. आपल्या ग्राहक सेवा संघात सुमारे 20,000 हंगामी किंवा तात्पुरत्या रोजगाराच्या संधी निर्माण करत असल्याची घोषणा अॅमेझॉन इंडियाकडून (Amazon India) करण्यात आली आहे. भारतातील आणि जगभरातील ग्राहकांना मदत करणं असं यामागे उद्देश आहे.
अॅमेझॉन इंडियाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, 'पुढील महिन्यांत ग्राहकांच्या वाहतुकीची अपेक्षित मागणी पूर्ण करण्यासाठी हैदराबाद, पुणे, कोयंबटूर, नोएडा, कोलकाता, जयपूर, चंदीगड, मंगलोर, इंदूर, भोपाळ आणि लखनऊ इथं नवीन तात्पुरती पदं रिक्त करण्यात येणार आहे. यासाठी ते ईमेल, चॅट, सोशल मीडिया आणि फोन अशा विविध माध्यमातून वैयक्तिक आणि उत्कृष्ट अनुभव मिळेल.'
कोरोनाची 3 नवी लक्षणं आली समोर, त्रास जाणवला तर तात्काळ करा COVID-19 टेस्ट
काय असेल योग्यता आणि कसा करावा अर्ज
- अॅमेझॉनद्वारे नवीन तात्पुरती पदांच्या भरतीसाठी उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असावा. त्याला इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलगू किंवा कन्नड भाषा अवगत असावी.
- यापैकी काही तात्पुरत्या जागा कर्मचाऱ्याचं काम आणि कंपनीच्या गरजेनुसार वर्षाच्या अखेरीस कायम पदांवर रूपांतरित केली जाऊ शकतात.
- ज्यांना या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे ते 1800-208-9900 वर कॉल करू शकतात किंवा seasonalhiringindia@amazon.com वर ईमेल पाठवू शकतात.
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीनं तोडले सगळे रेकॉर्ड, पाहा काय आहे आजचे दर
7 वर्षात दिल्या 7 लाख नोकऱ्या
तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक नेटवर्कमध्ये सातत्याने गुंतवणूक करुन 2025 पर्यंत 10 दशलक्षाहून अधिक नवीन रोजगारनिर्मिती करण्याची योजना अॅमेझॉनने जाहीर केली आहे. माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास, कन्टेन्ट निर्माण, रिटेल, लॉजिस्टिक्स आणि बांधकाम या क्षेत्रांमध्ये निर्माण झालेल्या हा रोजगार थेट आणि अप्रत्यक्ष असा दोन्ही असेल. अॅमेझॉनच्या गुंतवणूकीमुळे गेल्या सात वर्षांत भारतात सात लाख रोजगार निर्माण झाले आहेत.
संपादन - रेणुका धायबर