Home /News /national /

स्कीन लोशनऐवजी आले 19 हजारांचे हेडफोन, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

स्कीन लोशनऐवजी आले 19 हजारांचे हेडफोन, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

अनेक युझर्सनी तर चक्क गौतम यांना अमेझॉनवर केलेल्या ऑर्डरची लिंकही मागितली आहे.

    मुंबई, 12 जून: अनेकदा अमेझॉनवरून पार्सल मागवलं की घोळ होत असल्याच्या अनेक घटना पाहिल्या आहेत पण मागवलेल्या पार्सल ऐवजी दुसरंच पार्सल घरी पोहोचलं आणि तेही रिटर्न होणार नाही हे सांगणं असे प्रकार फार क्वचित पाहायला मिळतात. एका तरुणानं 300 रुपयांचं स्कीन लोशन मागवलं होतं त्याऐवजी त्याला 19000 रुपयांचे बोस (Bose Headphones) कंपनीचे हेडफोन्स आले आहेत. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी पार्सल रिटर्न करण्याची पॉलिसी सध्या बंद असल्यानं ते पार्सल तुम्हालाच ठेवा असं कस्टमर केअरकडून सांगण्यात आलं. गौतम रेगे नावाच्या तरुणानं त्याचा हा अनुभव ट्वीट करून सांगितला आहे. गौतम रेगे यांचा अनुभव पाहून युझर्स आश्चर्यचकीत झाले आहेत. अनेक युझर्सनी तर चक्क गौतम यांना अमेझॉनची लिंकही मागितली आहे. तर आणखी एका युझरने 'हॅलो, मला बोस हेडफोनच्या जागी चुकून स्कीन लोशन मिळाले असल्याचंही सांगितलं आहे. अमेझॉन कंपनीकडून कुरियरच्या झालेल्या अदलाबदलीमुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या