हिप्नोटाईज करून बलात्काराचा प्रयत्न, डिलिव्हरी बॉयकडून पार्सल घेताना घ्या काळजी

हिप्नोटाईज करून बलात्काराचा प्रयत्न, डिलिव्हरी बॉयकडून पार्सल घेताना घ्या काळजी

अॅमेझॉनवरून खरेदी करत कसाल तर वाचा ही बातमी.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : हल्ली घरातली छोट्यातली छोटी वस्तु ही ऑनलाईन मागवली जाते. ऑनलाईन वस्तु खरेदी केल्यानंतर डिलिव्हरी बॉय घरपोच सामना पोहचवतात, त्यामुळं हा पर्याय लोकांना सोयिस्कर असतो. मात्र नवी दिल्लीत या ऑनलाईन डिलिव्हरीचा एक भयंकर प्रकार घडला आहे. डिलिव्हरी बॉयनं सामना देताना चक्क महिलेला सम्मोहित केले.

अॅमेझॉनवरून खरेदी केलेल्या वस्तु पोहचवण्यासाठी घरी आलेल्या डिलिव्हरी बॉयनं महिलेला सम्मोहित केले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान महिला शुद्धीवर आली, आणि तिनं त्याचा विरोध केला. त्यानंतर या महिलेनं डिलिव्हरी बॉयची धुलाई केली. दरम्यान यासंदर्भात पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पिडीत महिलेनं केलेल्या आरोपात, अॅमेझॉनवरून काही दिवसांपूर्वी सामनाची खरेदी केली होती. मात्र त्यातील काही सामना परत पाठवायचे होते. त्यासाठी भुपेंद्र पाल नामक डिलिव्हरी बॉय त्यांच्या घरी पोहचला. त्यावेळी त्यांच्यात सामनावरून वाद झाला. त्यानंतर पिडित महिलेनं कस्टमर केअरला फोन लगावत याबाबत माहिती दिली. त्यानंतर भुपेंद्र पाल तेथून निघून गेला, अशी प्राथमिक माहिती दिली.

वाचा-Indian Armyने पाकिस्तानला शिकवला धडा; 3 चौक्यांसह मोठा शस्त्रसाठा केला नष्ट

पुन्हा घरी पोहचला डिलिव्हरी बॉय आणि...

पिडीत महिलेच्या घरून निघाल्यानंतर काही मिनिटांनी भुपेंद्र पुन्हा त्यांच्या घरी पोहचला. त्यानंतर पुन्हा बाचाबाची झाल्यानंतर अचानक पिडीत महिला बेशुद्ध झाली. दरम्यान जेव्हा पिडीतेला शुद्ध आली तेव्हा डिलिव्हरी बॉय अर्धनग्न अवस्थेत तिच्यासमोर उभा होता. घाबरलेल्या महिलेनं आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जवळच असलेल्या व्हायपरनं डिलिव्हरी बॉयची धुलाई केली. लगेचच भुपेंद्रनं तेथून पळ काढला.

वाचा-बछडा शिकतोय शिकाराची टेक्निक, आईवरच केलेल्या हल्ल्याचा पाहा VIRAL VIDEO

अॅमेझॉननं लगेचच केली कारवाई

दरम्यान या प्रकरणाबाबत अॅमेझॉनला तक्रार केली असता त्यांनी लगेचच कारवाई करणार असल्याचे सांगितले. अॅमेझॉनच्या प्रवक्त्यांनी, “ग्राहकांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळं अशा प्रकारांवर त्वरित कारवाई केली जाईल. आम्ही आमच्या डिलिव्हरी सर्व्हस प्रोव्हायडरवर कारवाई करत आहोत. त्याचबरोबर पोलिसही या प्रकरणाची चौकशी करणार आहे”, असे सांगितले.

वाचा-JIOने फ्री कॉल केले बंद, पण Vodafone-Ideaने ग्राहकांना दिला मोठा दिलासा

VIDEO :...म्हणून रिलायन्स जिओ फोन कॉल्ससाठी शुल्क आकारणार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: amazon
First Published: Oct 10, 2019 03:12 PM IST

ताज्या बातम्या