'बंगालमध्ये जय श्री रामचा नारा लोकांना मारहाण करण्यासाठी दिला जातोय'

'बंगालमध्ये जय श्री रामचा नारा लोकांना मारहाण करण्यासाठी दिला जातोय'

अमर्त्य सेन यांनी भाजपला टोला हाणला आहे.

  • Share this:

कोलकाता, 06 जुलै : पश्चिम बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जी विरूद्ध भाजपा असा सामना पाहायाला मिळत आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर देखील हा वाद वाढताना दिसत आहे. शिवाय, भाजपनं जय श्री रामचा नारा देत ममता बॅनर्जी यांना पत्रं देखील लिहिली आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी देखील मी जय श्री राम म्हणणार हिंमत असेल तर अटक करा असं आव्हान ममता बॅनर्जी यांना लोकसभा निवडणुकीवेळी दिलं होतं. तेव्हापासून सुरू झालेला वाद अद्याप देखील सुरू आहे. या साऱ्या प्रकरणावर नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी नाव न घेता भाजपवर निशाणा साधला आहे. जय श्री रामचा नारा बंगाली संस्कृतीशी संबंधित नसून लोकांना मारहाण करण्यासाठी या नाऱ्याचा वापर केला जात असल्याचं विधान अमर्त्य सेन यांनी शुक्रवारी केले. जाधवपूर येथे विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना अमर्त्य सेन यांनी हे विधान केलं.

आणखी काय म्हणाले अमर्त्य सेन

जय श्री राम नारा बंगाली संस्कृतिशी संबंधित नाही. आता राम नवमी सुद्धा लोकप्रिय होत आहे. याबद्दल यापूर्वी केव्हा ऐकलं नव्हतं. मी माझ्या चार वर्षाच्या नातीला तिच्या आवडत्या देवतेबद्दल विचारलं तेव्हा तिनं देखील माँ दुर्गा असं उत्तर दिलं असं अमर्त्य सेन यांनी म्हटलं आहे.

तर, गरिबांचे उत्पन्न वाढवून दुर्दशा संपणार नाही. आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा देखील गरीबी हटवण्यासाठी महत्त्वाची असल्याचं सेन यांनी म्हटलं आहे.

VIDEO: प्रशासनाचा भोंगळ कारभार उठतोय प्रवाशांच्या जीवावर

First published: July 6, 2019, 12:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading