मराठी बातम्या /बातम्या /देश /Amarnath Yatra: या दिवशी सुरू होणार अमरनाथ यात्रा, गेल्या 2 वर्षात जे घडलं नाही ते घडणार

Amarnath Yatra: या दिवशी सुरू होणार अमरनाथ यात्रा, गेल्या 2 वर्षात जे घडलं नाही ते घडणार

अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अमरनाथ यात्रेची (Amarnath Yatra) घोषणा करण्यात आली आहे

अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अमरनाथ यात्रेची (Amarnath Yatra) घोषणा करण्यात आली आहे

अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अमरनाथ यात्रेची (Amarnath Yatra) घोषणा करण्यात आली आहे

मुंबई, 13 मार्च: अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अमरनाथ यात्रेची (Amarnath Yatra) घोषणा करण्यात आली आहे. 28 जून 2021 रोजी अमरनाथ यात्रा सुरू होणार असून रक्षाबंधनाच्या दिवशी अर्थात 22 ऑगस्ट 2021 रोजी या यात्रेचा शेवट होणार आहे. दरम्यान यावर्षी ही यात्रा 56 दिवस असणार आहे. 2019 आणि 2020 या दोन्ही वर्षात जे घडलं नाही ते यावर्षी घडणार आहे. या वर्षात पहिल्यांदा यात्रेचा पूर्ण कालावधी पूर्ण करण्यात येणार आहे. यापूर्वी 2019 मध्ये 370 रद्द झाल्यामुळे यात्रा निश्चित तारखेपर्यंत पूर्ण करण्यात आली नव्हती. तर 2020 मध्ये कोव्हिड 19 (Coronavirus) मुळे यात्रा रद्द करण्यात आली होती. 2021 मध्ये तरी भाविकांना दर्शन घेता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यानुसार आज अमरनाथ यात्रेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

यावर्षी यात्रेचा एकूण कालावधी 56 दिवसांचा आहे. अमरनाथ यात्रेसाठी तुम्ही देखील नोंदणी (Amarnath Yatra Registration 2021) करू शकता. या नोंदणीसाठी फॉर्म 01 एप्रिलपासून उपलब्ध होईल. यावर्षी देखील सीआरपीएफ आणि आयटीबीपी जवानांना (CRPF/ITBP) अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचे जबाबदारी देण्यात आली आहे.

श्री अमरनाथ देवस्थान बोर्डाचे चेअरमन आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी शनिवारी राजभवनात सकाळी बोर्डाच्या सदस्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

First published:
top videos

    Tags: Corona virus in india, Covid19, India, Jammu and kashmir