स्नान करताना महिलेचा व्हिडीओ तयार करणारा पोलीस गजाआड

स्नान करताना महिलेचा व्हिडीओ तयार करणारा पोलीस गजाआड

अमरनाथ यात्रेतील महिलेचा स्नान करतानाचा व्हिडीओ शूट करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

श्रीनगर, 06 जुलै : जम्मूमधील अमरनाथ जिल्ह्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. महिला स्नान करत असताना या पोलीस कर्मचाऱ्यानं व्हिडीओ तयार केला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून तारिक अहमद असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्याच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. भारतीय पोलीस दलाच्या 19व्या बटालियनमध्ये तारिक अहमद हा कार्यरत होता. संबंधित महिला ही अमरनाथ यात्रेच्या शिबिरामध्ये स्नान करत होती. त्यावेळी तारिक अहमद हा मोबाईलच्या मदतीनं व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेनंतर त्रिकुटा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तारिक अहमदला अटक केल्यानंतर त्याला जामीनावर सोडून देण्यात आलं. दरम्यान त्याच्यावर विभागीय कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

67,000 लोकांनी दिली अमरनाथला भेट

आतापर्यंत 67,000 लोकांनी अमरनाथला भेट दिली आहे. तर, 5124 भाविकांचा एक गट अमरनाथकडे रवाना झाला आहे.

VIDEO: भाजप खासदार-टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद, कार्यकर्त्यांकडून हवेत गोळीबार

First published: July 6, 2019, 1:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading