अमरनाथ हल्ल्यातल्या मास्टरमाईंड अबू मोहम्मद इस्माईलचा शोध सुरूच

अमरनाथ हल्ल्यातल्या मास्टरमाईंड अबू मोहम्मद इस्माईलचा शोध सुरूच

केंद्र आणि जम्मू काश्मीर सरकारनं यात्रेकरूंना संपूर्ण सुरक्षेची हमी दिलीय. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल स्वत: यात्रेवर लक्ष ठेवून आहेत.

  • Share this:

12 जुलै : अमरनाथ यात्रेवर अतिरेकी हल्ल्याचा धक्का मोठा आहे. पण दहशतवादापुढे हार न मानता अमरनाथ यात्रा सुरूच आहे. अमरनाथ यात्रेवरच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड लष्कर ए तोयबाचा पाकिस्तानातला अतिरेकी अबू मोहम्मद इस्माईल आहे. त्याचा शोध घेण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी मोहीम वेगात सुरू केलीय.

तर दुसरीकडे केंद्र आणि जम्मू काश्मीर सरकारनं यात्रेकरूंना संपूर्ण सुरक्षेची हमी दिलीय. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल स्वत: यात्रेवर लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरक्षा संदर्भातली कॅबिनेट समितीची आज बैठक बोलावलीय.

First published: July 12, 2017, 11:10 AM IST

ताज्या बातम्या