'लष्कर ए तोयबा'कडूनच अमरनाथ यात्रेवर हल्ला, 15 वर्षांचा अलिखित करारही मोडला !

'लष्कर ए तोयबा'कडूनच अमरनाथ यात्रेवर हल्ला, 15 वर्षांचा अलिखित करारही मोडला !

इस्माईल नावाच्या पाकिस्तानी अतिरेक्याने हिजबुलच्या मदतीने हा हल्ला घडवल्याचे समोर आलंय. या हल्ल्यामुळे दहशवाद्यांनीच अमरनाथ यात्रेवर हल्ला न करण्याचा 15 वर्षांचा अलिखित करार स्वतःहूनच मोडल्याचं स्पष्ट होतंय.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जुलै : काश्मिर खोऱ्यात काल अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यापाठीमागे लष्कर ए तोयबा आणि हिजुबल मुजाहिद्दीन या दोन संघटनांचाच हात असल्याच गुप्तचर विभागाने म्हटलंय. इस्माईल नावाच्या पाकिस्तानी अतिरेक्याने हिजबुलच्या मदतीने हा हल्ला घडवल्याचे समोर आलंय. या हल्ल्यामुळे दहशवाद्यांनीच अमरनाथ यात्रेवर हल्ला न करण्याचा 15 वर्षांचा अलिखित करार स्वतःहूनच मोडल्याचं स्पष्ट होतंय कारण गेल्यावर्षी चकमकीत मारलेल्या गेलेल्या बुरहान वाणीनेच स्वतःहून यात्रेकरूंवर हल्ला करणार नसल्याचं एका व्हिडिओद्वारे जाहीर केलं होतं. तोच अलिखित करार कालच्या हल्ल्यामुळे मोडित निघालाय.

अमरनाथ यात्रेवरील हल्ल्यानंतर काश्मिर खोऱ्यातील चिघळलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत तातडीची बैठक बोलावली होती. त्यात अमरनाथ यात्रेच्या सुरक्षाव्यवस्थेचा पुन्हा आढावा घेण्यात आला. आणि यात्रेला कडेकोट सुरक्षा व्यवस्था देण्याचं निश्चित करण्यात आलंय. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, आयबी, रॉ आणि एनएसएचे अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. तिकडे श्रीनगरमध्येही राज्य सरकारने हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सुरक्षा यंत्रणांचा आढावा घेतला.

फुटिरवादी नेत्यांकडूनही हल्ल्याचा निषेध

काश्मीर खोऱ्यातील फुटिरवादी नेत्यांनाही अमरनाथ यात्रेवरील या दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध केलाय. हुर्रियतनेचे गिलानी यांनी हा मानवतेवरचा हल्ला असल्याचं म्हटलंय. तर या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अधिकाधिक यात्रेकरूंनी अमरनाथ यात्रेत सहभागी व्हावं, असं आवाहन जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केलंय.

अमरनाथ यात्रेवरील दहशतवादी हल्ल्यांच्या घटना

दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेवर आतापर्यंत पाच मोठे दहशतवादी हल्ले केले असून 2000 सालचा सर्वात मोठा हल्ला मानला जातो. पहलगाममध्ये झालेल्या यादहशतवादी हल्ल्यात 30 यात्रेकरू ठार झाले होते. लष्कर ए तोयबाने हा हल्ला केला होता. 1 ऑगष्ट 2000 रोजी अमरनाथ यात्रेकरुंच्या बेस कॅम्पवरच हा हल्ला करण्यात आला होता.

20 जुलै 2001

अमरनाथ यात्रेकरूंच्या कॅम्ववर लष्कर ए तोयबाच्या अतिरेक्यांनी ग्रेनेड फेकले, 15 जण जागीच ठार, मृतांमध्ये 3 महिला यात्रेकरूंसह 2 पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश

30 जुलै 2002

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी टॅक्सीवर ग्रेनेड फेकल्याने 2 अमरनाथ यात्रेकरू जागीच ठार

6 ऑगस्ट 2002

पहलगाममध्ये लष्कर ए तोयबाच्या अतिरेक्यांचा अमरनाथ यात्रेकरूंच्या बेस कॅम्पवर बेछूट गोळीबार, गोळीबारात 18 जण ठार, 27 जखमी

21 जून 2006

श्रीनगरमध्ये अतिरेक्यांनी अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर ग्रेनेड फेकल्याने 10 यात्रेकरू जखमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2017 12:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading