Home /News /national /

Amarnath Yatra : एका मुस्लिम मेंढपाळानं लावला अमरनाथ गुहेचा शोध? जाणून घ्या काय आहे सत्य

Amarnath Yatra : एका मुस्लिम मेंढपाळानं लावला अमरनाथ गुहेचा शोध? जाणून घ्या काय आहे सत्य

बुटा मलिक (Buta Malik) नावाच्या मुस्लिम मेंढपाळाने 1850 मध्ये अमरनाथ गुहेचा शोध लावल्याचं म्हटलं जातं. या दाव्यात किती तथ्य आहे?

    मुंबई, 7 जुलै : गेली दोन वर्षं कोरोनामुळे अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) होऊ शकली नव्हती. मात्र, यंदा ही यात्रा 30 जूनपासून सुरू झाली असून ती 11 ऑगस्टला पूर्ण होईल. यापूर्वी 2019 मध्ये कलम 370 रद्द झाल्यामुळे यात्रा निश्चित वेळापत्रकानुसार पूर्ण झाली नाही.. यंदा ही यात्रा तब्बल 56 दिवसांची असणार आहे. बाबा अमरनाथ हे हिंदू भाविकांचं श्रद्धास्थान असून दरवर्षी लाखो भाविक तिथं दर्शनाला जातात. अमरनाथ धाम जम्मू-काश्मीरमध्ये हिमालय (Himalaya) पर्वताच्या कुशीत वसलेलं आहे. इथं एका पवित्र गुहेत हिम शिवलिंगाच्या (Shivling) रूपात शिवजी विराजमान आहेत. या ठिकाणी दरवर्षी बर्फाचं शिवलिंग स्वतःहून नैसर्गिकरित्या तयार होतं. त्यामुळे हे ठिकाण अतिशय पवित्र मानलं जातं. बर्फापासून शिवलिंगाची निर्मिती झाल्यामुळे इथं शिवजींना बाबा बर्फानी (Baba Barfani) म्हटलं जातं. या गुहेचा शोध एका मुस्लिमाने (Muslim) लावला होता, अशी एक कथा प्रचलित आहे. मात्र, यात किती तथ्य आहे, हे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. कारण 19व्या शतकातील कोणत्याही कागदपत्रांत याबद्दलचा उल्लेख नाही; पण या दाव्यात खरंच कितपत तथ्य आहे ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न. काय आहे मुस्लिम मेंढपाळाची प्रचलित कथा? बुटा मलिक (Buta Malik) नावाच्या मुस्लिम मेंढपाळाने 1850 मध्ये अमरनाथ गुहेचा शोध लावल्याचं म्हटलं जातं. असं म्हणतात की, एकेदिवशी मेंढ्या चारत-चारत तो खूप दूर डोंगरावर गेला तिथं त्याला एका साधू भेटले. तिथे बुटाच्या नम्र आणि दयाळू स्वभावावर प्रसन्न होऊन साधूने बुटाला कोळशाने भरलेलं एक भांडं दिलं. बुटाने घरी येऊन ते भांडं पाहिलं तर कोळशाऐवजी सोन्यानं भरलं होतं. हे पाहून बुटाला खूप आनंद झाला आणि तो साधूचे आभार मानण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी गेला. त्याने तिथं जाऊन पाहिलं तेव्हा साधू तिथे नव्हते, पण एक गुहा होती. या संदर्भात 'टीव्ही 9 हिंदी'नं वृत्त दिलंय. बुटा जेव्हा त्या गुहेच्या आत पोहोचला तेव्हा त्याला बर्फापासून तयार केलेलं शिवलिंग दिसलं आणि ते दुरूनच चमकत होतं. हे अद्भुत शिवलिंग पाहून त्याचं मन शांत झालं. त्यानंतर तो गावात परतला आणि त्याने आपले अनुभव गावकऱ्यांना सांगितले. या घटनेनंतर तीन वर्षांनी पहिली अमरनाथ यात्रा सुरू झाल्याचं सांगण्यात येतं. बुटाचे वंशज आजही या गुहेची देखभाल करतात, असंही मानलं जातं. कोणत्याही कागदपत्रात उल्लेख नाही बुटाला ही गुहा सापडली किंवा त्याने शोधली या दाव्यात कितपत तथ्य आहे, याबद्दल काहीही सांगता येणार नाही. कारण 19व्या शतकातील कोणत्याही ऐतिहासिक दस्तावेजात असा उल्लेख आढळत नाही. प्रचलित कथेनुसार, बुटाने 1850 मध्येच ही गुहा शोधली होती. सांप्रदायिक सौहार्दाचं उदाहरण म्हणून बुटाच्या कथेचा प्रचार 20 व्या शतकात सुरू झाला. अनेक ठिकाणी बुटाचे नाव आणि त्याने गुहा शोधली ती तारीख स्वतंत्रपणे देण्यात आली आहे. आदम मलिक, अक्रम मलिक आणि बुटा मलिक असं या मेंढपाळाचं नावं त्यावर लिहिण्यात आलंय. तसंच अमरनाथ गुहेच्या (Amarnath Cave) शोधाचा काळ 16 वं शतक ते 19 व्या शतकात सापडतो. सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेल आणखी स्वस्त होणार; सरकारने उचललं महत्त्वाचं पाऊल ब्रिटिश प्रवाशाने दिली होती भेट 1842 मध्ये जीटी विग्ने हा ब्रिटिश प्रवासी अमरनाथला गेला होता. त्यावेळी त्याने भाविकांना अमरनाथला जाताना पाहिलं होतं. याचा उल्लेख त्यानी त्यांच्या एका पुस्तकात केला आहे. इतकंच नाही तर मुघल प्रशासक अली मर्दान खानने 17व्या शतकात बाबा बर्फानी आणि अमरनाथ यात्रेवर टीका केली होती, असं म्हटलं जातं. फ्रेंच प्रवासी फ्रँकोइस बर्नियर यांनी 1663 मध्ये काश्मीरच्या भेटीदरम्यान एका बर्फाच्या गुहेचा उल्लेख केला होता. तो अमरनाथ गुहेचाच उल्लेख असल्याचं मानलं जातं. या सर्व बाबी खऱ्या मानल्या तर मुस्लिम मेंढपाळाने गुहेचा शोध लावल्याची गोष्ट चुकीची असल्याचं सिद्ध होतं.
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Jammu kashmir

    पुढील बातम्या