नवी दिल्ली 22 एप्रिल: कोरोनाचा प्रसार देशात झपाट्याने होत आहे. रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे यावर्षीची ऐतिहासिक अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमरनाथ बोर्डाची आज जम्मूत बैठक झाली त्यात हा निर्णय झाला. उप राज्यपाल गिरीषचंद्र मुर्मू यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. 23 जूनपासून ही यात्रा सुरू होणार होती. मात्र कोरोनाची स्थिती पाहून बोर्डाने हा निर्णय घेतला होता. मात्र जम्मू आणि काश्मीरच्या माहिती विभागाने याबाबत काढलेलं पत्रक मागे घेतल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्यात कोरोनाचे 77 रेड झोन्स आहेत. या भागातून यात्रेचा प्रस्तावित मार्ग जाणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं मुर्मू यांनी सांगितलं. बाबा अमरनाथ यांचं दर्शन ऑनलाईन करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र जम्मू आणि काश्मीर माहिती विभागाने याबाबतची प्रेस नोटे मागे घेतली आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रेचं नक्की काय झालं याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
या आधीच देशातल्या सर्वच यात्रा, उरूस, मंदिरं बंद करण्यात आलेली आहे. जिथे कुठे गर्दी होण्याची शक्यता आहे अशी सर्वच ठिकाणं बंद करण्यात आली आहेत.
Jammu Kashmir Directorate of Information has now withdrawn press note which informed about cancellation of Amarnath Yatra 2020 https://t.co/N8b3C73f1p
दरम्यान, देशात कोरोनाचा प्रसार वाढतोच आहे. गेल्या 24 तासात 1 हजार 486 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 471 एवढी झाली आहे. तर 24 तासांमध्ये 49 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूची संख्या 652 झाली आहे. करोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. 3 मेरोजी देशभरातला लॉकडाऊन संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढची रणनीती काय असेल यावर या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये चर्चा होणार आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. कोरोनावर उपाय योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारने कडक पावलं उचलली आहे. लॉकडाउनचा हा दुसरा टप्पा सुरू आहे. येत्या 27 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहे. या चर्चेत कोरोना लढ्याची पुढची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे.
देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रत्येक राज्यात कोरोनाबाधितांचे आकडे बदलत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचे रुग्ण आणि मृतांचे प्रमाण कसे रोखता येईल यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.