Home /News /national /

अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा कट उधळला, मास्टरमाईंडसह 2 दहशतवाद्यांना अटक

अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा कट उधळला, मास्टरमाईंडसह 2 दहशतवाद्यांना अटक

अमरनाथ यात्रेवर (Amarnath Yatra) दहशतवादी हल्ला करण्याचा कट उधळण्यात आला आहे.

    मुंबई, 3 जुलै : कोरोना व्हायरसमुळे दोन वर्षाच्या कालखंडानंतर अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) पुन्हा एकदा सुरू झाली आहे. 30 जून रोजी यात्रेकरूंची पहिली तुकडी रवाना झाली आहे. या यात्रेवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट उधळण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमधील तुकसानमध्ये 'लष्कर ए तोयबा' या दहशतवादी संघटनेच्या 2 दहशतवाद्यांना अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. फैजल अहमद डार आणि तालिब हुसेन हे या दहशतवाद्यांची नावं आहेत. यापैकी फैजल हा लष्कर ए तोयबाचा पहिल्या श्रेणीतील दहशतवादी आहे. त्यांच्याकडून 2 AK-47 रायफल, 7 ग्रेनेड आणि एक पिस्टल जप्त करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांना पकडून देणाऱ्यांना ग्रामीण पोलिसांनी 2 लाख तर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी 5 लाखांचं बक्षिस जाहीर केलं आहे. या विषयावर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याची या दहशतवाद्यांची योजना होती. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हा हल्ला होणार होता. पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये या हल्ल्याच्या मास्टरमाईंचा समावेश आहे. यामधील तालिब हुसेननं यापूर्वी राजौरीमध्ये दोन बॉम्बस्फोटाची चाचणी घेतली होती. सलाम! लष्करानं विक्रमी वेळेत उभारले 2 पूल, अमरनाथ यात्रेचा मार्ग मोकळा, VIDEO तालिब हुसेनचा या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. त्यानं फैजलशी संपर्क साधला होता. त्यानंतर हे दोघं तुकसान जिल्ह्यातील गावात लपून बसले होते. त्यांनी पुढील हालचाल करण्यापूर्वीच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं त्यांना अटक केली आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Terrorist

    पुढील बातम्या