Home /News /national /

Amarnath Cave : यात्रेआधी समोर आला अमरनाथ गुहेतील शिवलिंगाचा मन प्रसन्न करणारा VIDEO

Amarnath Cave : यात्रेआधी समोर आला अमरनाथ गुहेतील शिवलिंगाचा मन प्रसन्न करणारा VIDEO

अमरनाथ गुफा आणि पवित्र लिंगम यांचं अतिशय मनमोहक दृश्य आता समोर आलं आहे (Amarnath cave Visuals) . याचे व्हिडिओ समोर आले असून ते मन प्रसन्न करणारे आहेत.

    श्रीनगर 28 जून : 30 जूनपासून दक्षिण काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुहेची यात्रा सुरू होत आहे. ही यात्रा (Amarnath Yatra) सुरळीत पार पाडण्यासाठी श्री अमरनाथ श्राइन बोर्ड (SASB) कोणतीही कसर सोडत नाहीये. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, जम्मू आणि काश्मीर प्रशासन पवित्र गुहेकडे जाणाऱ्या पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांवर अभेद्य सुरक्षा व्यवस्था करून श्राइन बोर्डाच्या प्रयत्नांना पाठिंबा देत आहे. यात्रेसाठी इच्छुक भाविकांसाठी मंडळ सर्व व्यवस्था करत आहे. एक माशामुळे मच्छिमार झाला लखपती, नेमका काय आहे प्रकार? ज्येष्ठ पौर्णिमेला, श्री अमरनाथ (अनंतनाग) च्या पवित्र गुहेत वैदिक मंत्रोच्चार आणि हर हर महादेवच्या जयघोषात पहिली पूजा करण्यात आली. गुहेत हिमलिंगच्या रुपात बाबा बर्फानी पूर्ण आकारात बसून दर्शन देत आहेत. प्रथम पूजेने याची पारंपारिक सुरुवात होते. अमरनाथ यात्रा 30 जूनपासून सुरू होत असून ती 11 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी संपणार आहे. यादरम्यान अमरनाथ गुफा आणि पवित्र लिंगम यांचं अतिशय मनमोहक दृश्य आता समोर आलं आहे (Amarnath cave Visuals) . याचे व्हिडिओ समोर आले असून ते मन प्रसन्न करणारे आहेत. आमदार चालवत होते दुचाकी, मागे बसलेले मंत्री; एक चूक पडली महागात, वाहतूक पोलिसाने अडवलं अन्.. अमरनाथ गुहेची अख्यायिका भगवान शंकराने याच गुहेत आपलं अस्तित्व आणि अमरत्वाबाबतचं रहस्य पार्वतीला सांगितल्याची अख्यायिका सांगितली जाते. या गुहेचा उल्लेख काश्मीरी इतिहासकार कल्हण यांनी 12व्या शतकात रचलेलं महाकाव्य 'राजतरंगिणी'तमध्येही आहे. या गुहेच्या छतातून थेंब थेंब पाणी गळतं तेच पाणी गोठून एक विशालकाय रुप धारण करतं. याचा आकार शिवलिंगाप्रमाणे दिसतो, त्यामुळे हिंदू भाविक दरवर्षी इथे दर्शनासाठी येतात. हिंदू भाविकांच्या पवित्र स्थानांपैकी एक म्हणजे अमरनाथ होय. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग परिसरातील बालाटल क्षेत्रात अमरनाथ गुहा आहे. या गुहेत बर्फाचं शिवलिंग असतं आणि ते थंडीच्या वातावरणातच आकार घेतं
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Video

    पुढील बातम्या