अलवर, 26 ऑक्टोबर : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील खैरथल पोलीस स्टेशन परिसरात एक भयंकर अपघात झाला. येथील दारूच्या दुकानाला भीषण आग लागली, यात दुकानदार जिवंत जाळला गेला. दारू कंत्राटदाराने लोखंडी व लाकडापासून विक्रीसाठी खोके तयार केले होते आणि विक्री करणाऱ्यांना त्यात बसण्याची व्यवस्था केली होती, ज्यामध्ये अज्ञात कारणांमुळे आग लागली. या अपघातात सेल्समन कमल किशोर याचा जागीच मृत्यू झाला. मात्र ही आग लागली नसून कमल किशोरच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जाळण्याची आल्याचा आरोप केला जात आहे.
याआधी करौलीमध्ये एका पुजाऱ्याला जिवंत जाळल्यानंतर या दुकानदारानं पगार मागितल्यानंतर त्याला कंत्राटदारानं पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. 23 वर्षीय कमल किशोरचा मृतदेह दारूच्या अड्ड्यावर डीप फ्रीजरमध्ये जळलेल्या अवस्थेत सापडला. कमल किशोरच्या कुटुंबियांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी असलेल्या तरुणाची आई याच गावाची सरपंच असल्याचे सांगितले जात आहे.
वाचा-दोन्ही पत्नीसोबत Live Sex Show करीत होता तरुण; डेटिंग अॅपमधून कमावले लाखो रुपये
मृत कमल किशोरच्या भावानं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितले की, त्याचा भाऊ खेरथल क्षेत्रात असलेल्या समीप कुमपूर गावात सुभाष यादव यांच्या दारूच्या अड्ड्यावर काम करत होता. पाच महिन्यांपासून त्याला पगार दिला नव्हता. पगार मागण्यासाठी कमल सुभाष यादव यांच्याकडे गेला. तेव्हा सुभाष यादव त्याला घेऊन दारूच्या अड्ड्यावर देले आणि त्यांनी पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा आरोप कमल किशोरच्या भावानं केला आहे.
वाचा-निलंबित नायब तहसीलदाराच्या मुलाची 20 पानी सुसाईट नोट लिहून आत्महत्या
कुटुंबियांनी सांगितले की, कंटेनर खोलल्यानंतर डीप फ्रिजरमध्ये कमलचा मृतदेह आढळला. कमलच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याआधी जाळण्यात आले, त्यानंतर त्याचा मृतदेह फ्रिजरमध्ये ठेवण्याता आला. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. सध्या राकेश यादव आणि सुभाष यादव यांच्याविरुद्ध हत्या आणि अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.