बधाई हो! राजस्थानमध्ये जन्माला आला नवा 'अभिनंदन'

बधाई हो! राजस्थानमध्ये जन्माला आला नवा 'अभिनंदन'

देशाचा रिअल हिरो अभिनंदन यांच्या शौर्य आणि धाडसाला प्रेरित होऊन किशनगडबास गावात राहणाऱ्या जनेश भूटानी या कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

राजस्थान, 02 मार्च : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात किशनगडबास गावात एका कुटुंबाने विंग कमांडर अभिनंदन यांच्या नावावरून त्यांच्या नवजात बाळाचं नाव ठेवलं आहे. आपल्या मुलाचं नाव अभिनंदन ठेवल्याने अभिनंदन यांचं शौर्य आणि पराक्रम कायम स्मरणात राहिल असं या जोडप्याचं म्हणणं आहे.

नवजात मुलाच्या आई सपना देवी या म्हणाल्या की, 'त्यांचा मुलगा विंग कमांडर अभिनंदनसारखा पराक्रमी व्हावा, तो देशाचा शुर वीर व्हावा. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव अभिनंदन ठेवलं आहे.' त्याचबरोबर हे पालक आपल्या मुलाला लष्करात भरती करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

देशाचा रिअल हिरो अभिनंदन यांच्या शौर्य आणि धाडसाला प्रेरित होऊन किशनगडबास गावात राहणाऱ्या जनेश भूटानी या कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला आहे. त्यातही विशेष म्हणजे ज्यावेळी टीव्हीवर अभिनंदन यांच्या बातम्या सुरू असतानाच त्यांच्या पत्नीला प्रसुतीकळा सुरू झाल्या आणि त्यांनी एका गोड मुलाला जन्म दिला.

ज्यावेळी बाळाचा जन्म झाला त्यावेळी दे रुग्णालयातही टीव्ही पाहत होते. त्यामुळे अभिनंदनच्या त्या शौर्याला सलाम करत या जोडप्याने त्यांच्या नवजात बाळाचं नाव अभिनंदन ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विंग कमांडर अभिनंदन हे भारतात परतल्याचं वृत्त येताच त्यांनी संपूर्ण गावात पेढे वाटले.

अभिनंदनचा अर्थ आता बदलला आहे - पंतप्रधान मोदी

'भारत देश जे काही करतो, त्याकडे जग गांभीर्यानं पाहत असतं. शब्दकोशातील शब्दांचा अर्थ बदलण्याची ताकद या देशात आहे. कधी काळी 'अभिनंदन' या शब्दाचा अर्थ 'Congratulation' असा होता, मात्र आता 'अभिनंदन'चा अर्थ बदलला आहे', अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे.

अभिनंदन यांचा अभिमान

भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान  शुक्रवारी (2 मार्च) देशात परतले. शुक्रवारी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास अभिनंदन यांनी पाकिस्तानची हद्द पार करत भारतात प्रवेश केला. यापूर्वी कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचं कारण देत पाकिस्तानने अभिनंदन यांच्या भारतवापसीमध्ये दिरंगाई केली होती.

वाघा बॉर्डरवर विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारताच्या ताब्यात सोपवलं. यावेळी सगळ्यात आधी 'आता छान वाटतं आहे' असं अभिनंदन म्हणाले. अभिनंदन यांच्या मायदेशी परतल्याने जो आनंद अवघ्या देशाला झाला होता तोच आनंद आणि आपल्या देशाप्रती असलेला अभिमान हा या ढाण्या वाघाच्या डोळ्यांत दिसत होता.

बॉर्डवर भारताकडे आल्यानंतर सगळ्यात आधी अभिनंदन यांना अमृतसरहून दिल्लीला आणण्यात आलं. त्यांना वायुदलाच्या विमानाने पालम एअरपोर्टवर आणण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (2 मार्च)भारतीय लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अभिनंदन यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.

एअर स्ट्राईकवरून पुन्हा दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न

नेमकी काय आहे घटना?

- पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय हद्दीत प्रवेश केला.

- पाकिस्तानच्या या विमानांना पिटाळण्यासाठी मिग-21 या भारतीय विमानांचे पायलट असलेल्या अभिनंदन यांनी F-16 चा पाठलाग केला.

- पाठलाग करताना त्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत F-16 ला पाडलं मात्र त्यांच्या विमानात बिघाड झाला.

- त्यानंतर त्यांनी पॅरेशुटच्या मदतीने खाली उडी घेतली आणि ते पाकिस्तानच्या हद्दीत उतरले.

- पाकिस्तानच्या किल्लान या गावात अभिनंदन यांना 27 फेब्रुवारीला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलं.

- पाकिस्तानच्या माध्यमांनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले.

- संध्याकाळी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारताचा एक पायलट बेपत्ता असल्याचं मान्य केलं.

- नंतर जगभरातून पाकिस्तानवर दबाव निर्माण झाला. भारतानेही मुत्सद्देगिरीच्या पातळीवर हा विषय हाताळत पाकिस्तानवर मात केली

- आणि तणाव निवळण्यासाठी अखेर पाकिस्तानला अभिनंदन वर्तमान यांना सोडाव लागलं.


VIDEO: ...तर अक्षरश: कंगाल होतील हे पाकिस्तानी कलाकार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 02:19 PM IST

ताज्या बातम्या