समलैंगिक प्रेमिकेनं विवाहित महिलेला पळवलं

Lesbian लग्नानंतर महिला आपल्या प्रेमिकेसोबत राहत होती. अलवर पोलिसांनी दोघांनी मानेसर येथून ताब्यात घेतलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2019 03:33 PM IST

समलैंगिक प्रेमिकेनं विवाहित महिलेला पळवलं

अलवर, 25 जून : राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील विवाहितेला पोलिसांनी 23 दिवसानंतर अटक केली आहे. यानंतर न्यायालयात हजर केल्यानंतर एक धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. कारण, या समलैंगिक प्रेमिकेनं विवाहित महिलेला पळवलं आणि दोघी हरियाणाच्या मानेसर येथे राहत होत्या. ज्यावेळी विवाहितेनं न्यायालयामध्ये प्रेमिकेसोबत राहत असल्याची माहिती दिली तेव्हा सासरच्या मंडळींना देखील धक्का बसला. कारण, सासरच्या मंडळींना याबद्दल कोणतीच कल्पना नव्हती. न्यायालयामध्ये साक्ष दिल्यानंतर विवाहित महिला पुन्हा आपल्या प्रेमिकेकडे मानेसर येथे दाखल झाली. 23 दिवसांपूर्वी विवाहित महिला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर शोध घेत पोलिसांनी महिलेला हरियाणातील मानेसर येथून ताब्यात घेत न्यायालयात हजर केलं. पण, आपली साक्ष नोंदवल्यानंतर विवाहित महिला पुन्हा एकदा मानेसर येथे आपल्या प्रेमिकेच्या घरी दाखल झाली.

अ‍ॅम्ब्युलन्स न मिळाल्यानं वडिलांनी 8 वर्षाच्या मुलाचा मृतदेह नेला खांद्यावरून

लिव्ह – इन – रिलेशनशिपमध्ये राहतात

राजस्थानमधील पोलीस विवाहित महिलेचा शोध घेत हरियाणातील मानेसर येथे पोहोचली. त्यावेळी चौकशीअंती सर्व गोष्टींचा खुलासा झाला. समलैंगिक प्रेमिकेसोबत राहण्यासाठी प्रेमिकेनं नवऱ्याचं घर सोडल्याची बाब देखील पुढे आली. दोघी जणी आपल्या इच्छेनुसार लिव्ह – इन – रिलेशनशिपमध्ये राहतात.

कुटुंबियांना होती कल्पना

Loading...

दरम्यान, महिला समलैंगिक असल्याचा माहिती कुटुंबियांना होता. संबंधित महिला राष्ट्रीय खेळाडू आहे. दोघींमध्ये 4 ते 5 वर्षाचं अंतर आहे. घरच्यांना समलैंगिकतेबद्दल माहिती असून देखील त्यांनी जबरदस्तीनं लग्न लावून दिलं. पण, त्यानंतर देखील महिला आपल्या प्रेमिकेकडे राहायाला गेली.

VIDEO: पाणी बिलाच्या थकबाकीवर मुख्यमंत्री म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 03:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...