S M L

'तू दलित आहेस आमचं बिघडवू शकत नाही'; गँगरेपपूर्वी पीडितेला नराधमांनी धमकावलं

जात विचारत नराधमांनी गँगरेप केल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 05:27 PM IST

'तू दलित आहेस आमचं बिघडवू शकत नाही'; गँगरेपपूर्वी  पीडितेला नराधमांनी धमकावलं

अलवर, 21 मे : राजस्थानमधील अलवर येथे झालेल्या सामुहिक बलात्कराच्या घटनेनं सारा देश हादरून गेला. त्यानंतर पोलिसांनी पाचही आरोपींना अटक देखील केली. आता या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. बलात्कार करण्यापूर्वी नराधमांनी पीडित आणि तिच्या पतीला तुझी जात कोणती असा सवाल केला. यावर पीडित आणि पतीनं जात दलित असल्याचं सांगितलं. यावर नराधमांनी 'तू दलित आहेस आमचं बिघडवू शकत नाही' म्हणत पीडितेवर सामुहिक बलात्कार केला. पतीसमोर झालेल्या बलात्काराच्या घटनेनं सारा देश हादरून गेला होता. 'इंडियन एक्सप्रेस'नं याबाबत माहिती दिली आहे.

काय दिली पीडितेनं माहिती

दोन बाईकवरून आरोपी आले होते. त्यांनतर नराधमांनी बाईकवरून पाठलाग केला. ते सतत पीडितेच्या गाडीचा पाठलाग करत ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होते. रस्त्यामध्ये अडवल्यानंतर त्यांनी नाव आणि वडिलांचं नाव विचारलं. त्यानंतर त्यांनी पतीला जात कोणती? असा सवाल केला. जेव्हा आम्ही दलित असल्याचं सांगितलं तेव्हा त्यांनी तुम्ही आमचं काहीही करू शकत नाही असं म्हटलं.



भाजपला मत दिलं म्हणून पत्नीची फावड्यानं हत्या

जवळच्या झुडपांमध्ये नेत केला बलात्कार

Loading...

पीडितेला नराधमांनी जवळच्या झाडीमध्ये नेलं आणि तिच्या पतीसमोर पाच नराधमांनी बलात्कार केला. पाच आरोपी बलात्कार करत असताना सहावा आरोपी व्हिडीओ तयार करत होता. शिवाय, पीडितेच्या पतीला देखील व्हिडीओ बनवण्यासाठी दबाव टाकला.

व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

दरम्यान, या घटनेनंतर त्यांनी 19 वर्षाच्या पीडितेला 2000 रूपये दिले. तसंच या घटनेबद्दल कुठे वाच्छता केल्यास किंवा पोलिसांकडे तक्रार केल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. 28 एप्रिल रोजी आरोपींनी फोन करून 10 हजारांची मागणी केली. शिवाय, पैसे न दिल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली.

घरी सुरू होती लग्नाची तयारी

ज्यावेळी पीडितेवर बलात्कार झाला तेव्हा तिच्या घरी भाचाच्या लग्नाची तयारी सुरू होती. ज्यावेळी पीडिता झोपायला जाते तेव्हा तिला सारा घटनाक्रम आठवतो. त्यानंतर ती दचकून जागी होते असं पीडितेनं म्हटलं आहे. दरम्यान, पीडितेनं आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे.


VIDEO: आयफेल टॉवरवर चढणारा 'स्पायडर मॅन' ताब्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2019 12:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close