पाटना, 24 मार्च : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या प्रभावामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने नागरिकांना गर्दी न करण्याचं, घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. त्यापार्श्वभूमीवर बिहारमधून (Bihar) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
भोजपूर जिल्ह्यातील आरा या भागात मंगळवारी एका चोराची जोरदार धुलाई झाली. दैनिक जागरणमधील बातमीनुसार सहार ठाणे क्षेत्रात नोनऊर गावातील एक व्यक्ती चोरी करण्यासाठी सकाळी एका घरात शिरला होता. घरातील सदस्यांनी या चोराला रंगेहाथ पकडले. यानंतर हळूहळू गावातील नागरिक जमा झाले. गावकऱ्यांनी चोराची धुलाई केली. बराचं वेळ गावकरी त्याला मारत होते. चोराला इतकी मारहाण झाली की तो रक्तबंबाळ झाला. सध्या देशभरात कोरोनाचा (Covid - 19) धोका असताना चोर घरात शिरल्याने गावकऱ्यांनी सर्व राग त्या चोरावर काढला.
हे वाचा - VIDEO मला कोरोना नाहीये, माझ्या आईला त्रास देऊ नका; विमान कर्मचारी ढसाढसा रडली
गावकरी इतक्यावरच थांबले नाही. तर जमावाने त्याला एका खांबाला बांधलं आणि पुन्हा त्याची धुलाई सुरू केली. लोकांनी लाथा-बुक्क्यांनी त्याला मारहाण केली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी आले व त्यांनी चोराला वाचवले. त्या चोराचे नाव भूषण पासवान असं आहे. यापूर्वीही भूषणने अनेकदा चोऱ्या केल्या आहेत. भोजपूर पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून भूषणच्या शोधात होती. पोलिसांनी भूषणला अटक केली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे वाचा - मी आज काही बंद करायला आलेलो नाही' , मुख्यमंत्र्यांनी केली सहकार्याची अपेक्षा