पेट्रोल खरेदी केलं म्हणून उपाशी तर मरत नाही ना ?, भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य

पेट्रोल खरेदी केलं म्हणून उपाशी तर मरत नाही ना ?, भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य

'कार आणि दुचारी वापरणारी लोकंच पेट्रोल खरेदी करतात. त्यामुळे त्यांना सुविधा हव्या असतील तर पैसे द्यावेच लागतील"

  • Share this:

16 सप्टेंबर : पेट्रोल जी लोकंच खरेदी करतात ज्यांच्याकडे कार आणि दुचाकी आहे. त्यामुळे कार आणि दुचाकी वापरणारे उपाशी तर मरत नाही ना ? असं वक्तव्य नव्याने केंद्रीय पर्यटन मंत्री झालेले अल्फोन्स कन्नथानम यांनी केलंय.

एकीकडे देशभरात इंधनाच्या दरात झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागलीये. तर दुसरीकडे नव्यानेच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात दाखल झालेले केंद्रीय पर्यटन मंत्री अल्फोन्स कन्नथानम यांनी इंधन दरवाढीवर वक्तव्यकरून सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. कार आणि दुचारी वापरणारी लोकंच पेट्रोल खरेदी करतात. त्यामुळे त्यांना सुविधा हव्या असतील तर पैसे द्यावेच लागतील. त्यामुळे त्यांनी पेट्रोल खरेदी केलं तर ते काही उपाशी तर मरत नाही. त्यांना पैसे तर द्यावे लागणार असं कन्नथानम यांनी म्हटलंय.

आम्ही इथं मागासवर्गाच्या कल्याणासाठी आणि प्रत्येक गावात वीज देणे, घरं देण्यासाठी कटीबद्ध आहोत. यावर जास्त खर्च होतोय. त्यामुळे आम्ही अशा लोकांवर कर लादतोय जे कर भरू शकतात असंही कन्नथानम यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे केंद्र सरकारने वेळोवेळी महसूल करात वाढ केल्यामुळे पेट्रोलच्या किंमतीत वाढ झालीये. तसंच प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या करांमुळे पेट्रोलच्या दरात भडका उडालाय.

यावर केंद्रीय मंत्री कन्नथानम यांनी, आम्ही कर यासाठी लावलाय की गरीब लोकं सन्मानाने जगू शकतील. जे पैसे गोळा होतायत ते काही आम्ही चोरी करत नाही असा खुलासाही केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2017 05:38 PM IST

ताज्या बातम्या