OPINION : अल्पेश ठाकूर यांच्या राजीनाम्याचा मोदी - शहांच्या बालेकिल्ल्यात होणार फायदा

OPINION : अल्पेश ठाकूर यांच्या राजीनाम्याचा मोदी - शहांच्या बालेकिल्ल्यात होणार फायदा

ओबीसी नेते अल्पेश ठाकूर यांनी अखेर काँग्रस सोडली आणि त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. ऐन निवडणुकीत अल्पेश ठाकूर यांनी दिलेला काँग्रेसचा राजीनामा भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतो.

  • Share this:

विजयसिंह परमार

अहमदाबाद, 11 एप्रिल :ओबीसी नेते अल्पेश ठाकूर यांनी अखेर काँग्रस सोडली आणि त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. काँग्रेसमध्ये आपल्याला चांगली वागणूक मिळत नाही, असा आरोप करत अल्पेश ठाकूर यांनी आपल्या 2 समर्थकांसह पक्ष सोडला.

भाजपच्या गोटात ही बातमी समजली तेव्हा नेत्यांनी या संधीचा फायदा उठवायचं ठरवलं. ऐन निवडणुकीत अल्पेश ठाकूर यांनी दिलेला काँग्रेसचा राजीनामा भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतो.

गुजरातमधलं बनासकाठा, साबरकाठा आणि पाटण सारख्या जागांमध्ये भाजप अडचणीत आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे गड मानले जातात. अल्पेश ठाकूर यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या ठाकूर समाजातली मतं आता काँग्रेसकडे जाणार नाहीत, असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे.

गुजरातचे त्रिदेव

पाटीदार नेता हार्दिक पटेल, दलित कार्यकर्ते जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकूर हे तिघेजण आधी सोबत होते. सुरुवातीला अल्पेश ठाकूर यांचा ओबीसी नेता म्हणून उदय झाला. ते हार्दिक पटेल यांचे विरोधक मानले जात होते.पण नंतर या दोघांनी हातमिळवणी करत भाजपच्या विरोधात मोहीम सुरू केली. पण आता अल्पेश ठाकूर यांचा राजीनामा पाहता भाजपचं 'ऑपरेशन लोटस' पुन्हा सुरू झालं, असं म्हणता येईल.

अल्पेश ठाकूर, जिग्नेश मेवाणी आणि हार्दिक पटेल हे तिन्ही युवा नेते गुजरात विधानसभा निवडणुकांच्या वेळी वेगाने पुढे आले. हार्दिक पटेल यांनी 2015 मध्ये ओबीसींसाठी शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षणाची मागणी केली. त्यांनी पाटीदार अनामत आंदोलनाची सुरुवात केली. अल्पेश ठाकूर यांचीही ओबीसी नेते म्हणून ओळख निर्माण झाली. दुसरकीडे दलित नेता म्हणून 2016 मध्ये जिग्नेश मेवाणी सगळ्यांच्या समोर आले.

अल्पेश यांची मनधरणी

या सगळ्या घडामोडींनतर हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवाणी एका मंचावर पाहायला मिळाले. या तिघांनीही नरेंद्र मोदींना थेट आव्हान दिलं होतं.पण आता अल्पेश ठाकूर यांच्या राजीनाम्यामुळे या त्रिूमूर्तींची ताकद कमी झाल्याचं बोललं जात आहे. अल्पेश ठाकूर यानी काँग्रेसमध्ये परत यावं, यासाठी हार्दिक पटेल प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्या या प्रयत्नांना आता किती यश येतं हे मात्र पाहावं लागेल.

========================================================================================================================================================

VIDEO : सुजय विखेंबद्दल शरद पवारांचा मोठा खुलासा

First published: April 11, 2019, 4:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading