Elec-widget

गुजरातेत काँग्रेसला मोठा झटका, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अल्पेश ठाकोरांचा पक्षाला रामराम

गुजरातेत काँग्रेसला मोठा झटका, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अल्पेश ठाकोरांचा पक्षाला रामराम

अल्पेश हे गुजरातमधील मागासवर्ग नेता आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. गुजरातमध्ये जवळजवळ 50 टक्के मतदार मागासवर्गीय आहेत.

  • Share this:

अहमदाबाद, 10 एप्रिल- लोकसभा निवडणुकीच्या गुजरातेत काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.  काँग्रेस नेते अल्पेश ठाकोर यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे. अल्पेश ठाकोर यांनी 2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अल्पेश ठाकोर राधानपूरमध्ये जिंकले. त्यांनी भाजपच्या लाविंगजी ठाकोर यांचा पराभव केला होता. अल्पेश यांना  77 हजार मतं तर भाजपच्या उमेदवाराला 63 हजार मतं  मिळाली होती.

अल्पेश हे गुजरातमधील मागासवर्ग नेता आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. गुजरातमध्ये जवळजवळ 50 टक्के मतदार मागासवर्गीय आहेत. त्यामुळे या वर्गाचा नेता कुठल्याही पक्षासाठी महत्त्वाचा आहे. गुजरात ओबीसी एकता मंचचे संयोजक ठाकोर यांचा मागासवर्गावर प्रचंड प्रभाव आहे. त्यांनी राज्यात अमली पदार्थांविरोधात लढा दिलाय. ते दारूबंदीच्या बाजूचे आहेत. अल्पेश यांनी पाटीदारांना आरक्षण देण्याचा विरोध केला. त्याला समांतर आंदोलनही उभे केले आहे.


एअर स्ट्राईक ते राफेल करार, मोदींची UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2019 10:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com