Gujarat Elections Result 2017 : काँग्रेसचे अल्पेश ठाकोर जिंकले

Gujarat Elections Result 2017 : काँग्रेसचे अल्पेश ठाकोर जिंकले

काँग्रेसचे अल्पेश ठाकोर राधानपूरमध्ये जिंकले. त्यांनी भाजपच्या लाविंगजी ठाकोर यांना हरवलं. अल्पेशला 77 हजार मतं मिळाली. तर भाजपच्या उमेदवाराला 63 हजार मतं पडलीयत.

  • Share this:

18 डिसेंबर : काँग्रेसचे अल्पेश ठाकोर राधानपूरमध्ये जिंकले. त्यांनी भाजपच्या लाविंगजी ठाकोर यांना हरवलं. अल्पेशला 77 हजार मतं मिळाली. तर भाजपच्या उमेदवाराला 63 हजार मतं पडलीयत.

अल्पेश गुजरातच्या मागासवर्गाचा नेता आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून तो ओळखला जातो. गुजरातमध्ये जवळजवळ 50 टक्के मतदार मागासवर्गीय आहेत. त्यामुळे या वर्गाचा नेता कुठल्याही पक्षासाठी महत्त्वाचा आहे.

गुजरात ओबीसी एकता मंचचे संयोजक ठाकोर यांचा मागासवर्गावर प्रचंड प्रभाव आहे. त्यांनी राज्यात अमली पदार्थांविरोधात लढा दिलाय. ते दारूबंदीच्या बाजूचे आहेत.

अल्पेशनं पाटीदारांना आरक्षण देण्याचा विरोध केलाय. त्याला समांतर आंदोलनही चालवलंय. अल्पेशनं अनेकदा गुजरातची परिस्थिती वाईट आहे, हे सांगितलंय.

ओबीसी नेत्यानं काँग्रेसकडे जाणं भाजपसाठी चांगली गोष्ट नाही, असं एका विश्लेषकानं सांगितलंय.

First published: December 18, 2017, 6:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading