मराठी बातम्या /बातम्या /देश /

काळजी घ्या! कोरोनासोबत आता डेंग्यूचाही हल्ला, अनेक राज्यांत वाढतायत रुग्ण

काळजी घ्या! कोरोनासोबत आता डेंग्यूचाही हल्ला, अनेक राज्यांत वाढतायत रुग्ण

देशात कोरोना रुग्णांची (Corona patients) संख्या वाढायला सुरुवात झाली असताना आता डेंग्यूनंदेखील (Dengue) डोकं वर काढायला सुरुवात केली आहे.

देशात कोरोना रुग्णांची (Corona patients) संख्या वाढायला सुरुवात झाली असताना आता डेंग्यूनंदेखील (Dengue) डोकं वर काढायला सुरुवात केली आहे.

देशात कोरोना रुग्णांची (Corona patients) संख्या वाढायला सुरुवात झाली असताना आता डेंग्यूनंदेखील (Dengue) डोकं वर काढायला सुरुवात केली आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर : देशात कोरोना रुग्णांची (Corona patients) संख्या वाढायला सुरुवात झाली असताना आता डेंग्यूनंदेखील (Dengue) डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये (various states) डेंग्यूचे रुग्ण वाढत असून डेंग्यु आणि व्हायरल फिव्हरच्या रुग्णांमध्ये  (Viral Fever) वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. विशेषतः उत्तरेकडील राज्यांमध्ये डेंग्युनं थैमान घातलं असून आतापर्यंत 100 जणांचा डेंग्यूनं बळी घेतला आहे.

उत्तरेत थैमान

उत्तरेतील राज्यांमध्ये डेंग्यू आणि व्हायरल फिव्हरनं थैमान घातलं आहे. डेंग्युमुळे सर्वाधिक मृत्यू उत्तर प्रदेशमध्ये झाले असून आतापर्यंत मृत्यूचा आकडा 75 वर पोहोचला आहे. त्याखोलाखाल मध्यप्रदेशातील रुग्णांची संख्या आहे. एकीकडे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ व्हायला सुरुवात झाल्याचं चित्र असताना डेंग्यू आणि इतर आजारांमुळेही रुग्ण वाढत असल्यामुळे रुग्णालयांवर भार पडत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीत जर तिसरी लाट आली, तर आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

राजधानीतही गोंधळ

देशाची राजधानी दिल्लीतही डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असून आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढू लागला आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डेल्टा व्हायरसमुळे तिसरी लाट काही राज्यांत जोरदार धुमाकूळ घालेल, अशी शक्यता याअगोदरच वर्तवण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेत ज्या राज्यांना कमी फटका बसला, त्या राज्यांना तिसऱ्या लाटेचा फटका बसू शकतो, असा अंदाज साथरोग तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अशात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे चिंता वाढली आहे.

हे वाचा - मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना आग्र्यातून अटक

काळजी घेण्याचं आवाहन

लसीकरण झाल्यामुळे अनेक नागरिक मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र नागरिकांनी मास्क लावणे आणि कोरोनाबाबतची इतर काळजी घेणे गरजेचे असल्याचे वैदकीय तज्ज्ञ सांगतात. अनेकांना कोरोनाचा त्रास झाला नाही, तरी मास्क न वापरल्यामुळे ते व्हायरसचे कॅरिअर होण्याची शक्यता असते. तर डेंग्यूच्या बाबतीत काळजी घेणे गरजेचे असून परिसरात स्वतच्छता राखणे गरजेचे असल्याचं सांगितलं जातं. डेंग्यूच्या डासांची जन्मस्थाने नष्ट करणे, डबके, गटारी, साचलेले पाणी ही ठिकाणं स्वच्छ आहेत ना, याची खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

First published: