News18 Lokmat

मोदी सरकारचा झटका, CBI चे प्रमुख झाले अग्निशमन दलाचे महासंचालक!

CBI प्रमुखांची हकालपट्टीकरून त्यांची अग्निशन दलात नियुक्ती करण्याचा प्रकार इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 10, 2019 08:10 PM IST

मोदी सरकारचा झटका, CBI चे प्रमुख झाले अग्निशमन दलाचे महासंचालक!

नवी दिल्ली 10 जानेवारी : कोर्टाच्या दणक्यानंतर पुन्हा नियुक्त झालेले CBI चे प्रमुख अलोक वर्मांची यांची हकालपट्टी झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. सीव्हीसीने वर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले असून त्यानंतर सरकारने ही कारवाई केली. मोईन कुरेशी प्रकरणात वर्मा यांनी लाच घेतल्याचा आरोप सीव्हीसीने ठेवला आहे. 77 दिवसांच्या सक्तिच्या रजेवरून वर्मा आजच सीबीआय मुख्यालयात रूजू झाले होते. वर्मा यांना


वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने बेकायदा ठरवला होता, त्यानंतर वर्मा सीबीआय मुख्यालयात रूजू झाले होते. वर्मा हे 31 जानेवारीला निवृत्त होणार होते. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आज निवड समितीची बैठक झाली. या बैठकिला पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एके सिक्री उपस्थित होते.


या बैठकीत पंतप्रधानांनी वर्मा यांच्याविरूद्ध सुरू असलेल्या सीव्हीसी चौकशीचा अहवालच ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. या अहवालावर न्यायाधीश सिक्री यांनी समाधन व्यक्त केलं तर मल्लीकार्जुन खरगे यांनी या निर्णयाला विरोध केला. त्यानंतर दोन विरुद्ध एक मताने या निर्णयाला मंजूरी दिली गेली.

Loading...


नागेश्वर राव हे सीबीआयच कार्यभार सांभाळणार आहेत. वर्मा यांनी कारभार स्वीकारल्यानंतर ते रजेवर असताना केलेल्या अनेक बदल्या रद्द केल्या होत्या. ते नसताना 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. सरन्यायाधीश रंजन गोगोई हे रजेवर असल्याने त्यांनी त्यांच्या वतीने सिक्री यांना बैठकीसाठी पाठवलं होतं.


अलोक वर्मा यांना अग्निशनदलाचे महासंचालक म्हणून पोस्टिंग देण्यात आलं आहे. ही त्यांना दिलेली शिक्षाच समजण्यात येत आहे.


वादाचं काय आहे कारण


सीबीआयचे प्रमुख अलोक वर्मा आणि क्रमांक दोनचे अधिकारी राकेश अस्थाना यांच्यातला संघर्ष शिगेला पोहोचला होता. हा अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचल्यानंतर वादामध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करत आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना या दोघांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं.  तर नागेश्वर राव यांनी सीबीआयचे नवे हंगामी संचालक म्हणून नियुक्ती केली होती.


आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांची कार्यालयेदेखील सील करण्यात आली होती. सीबीआयच्या महत्त्वाच्या तपासामधले अधिकारीही बदलण्यात आले होते. सीबीआय संचालक आलोक वर्मा यांनी दुसऱ्या नंबरवरील अधिकारी राकेश अस्थाना यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप केला आहे. या प्रकारावर पंतप्रधान कार्यालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 10, 2019 07:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...