Elec-widget

निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक सर्व्हे, उत्तर प्रदेशात भाजपला 'अच्छे दिन'

निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक सर्व्हे, उत्तर प्रदेशात भाजपला 'अच्छे दिन'

या नव्या सर्व्हेत उत्तर प्रदेशात महाआघाडीची जादू चालणार नाही असं स्पष्ट झालंय तर भाजप चांगल्या जागा पटकाविणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 8 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला आता फक्त तीन दिवस राहिले आहेत. देशाचं जनमत काय आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अनेक सर्व्हे येत आहेत. सगळ्याचं लक्ष लागलंय ते उत्तर प्रदेशात काय होणार याकडे कारण उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वात जास्त जागा आहे. त्यामुळे तिथे काय होणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. उत्तर प्रदेशात महाआघाडीची जादू चालणार नसून भाजपला फायदा होणार असल्याचं या सर्व्हेतून पुढे आलंय.

Times Now ने केलेल्या सर्व्हेमध्ये उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीला 25 ते 27 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. तर भाजपला 50 जागा मिळतील असा अंदाज आहे. उत्तर प्रदेशात महाआघाडी झाल्यामुळे 2014मध्ये सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र तसं काही होताना यात दिसत नाही. दिल्लीत आम आदमी पक्षाला धक्का बसणार आहे. दिल्लीतल्या सातही जागा या भाजपला मिळणार असल्याचं या सर्व्हेत सांगण्यात आलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपला अच्छे दिन येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे

फस्टपोस्ट Trust Survey

देशाचा विश्वास कुणावर? देशातल्या जनतेचा कुणाच्या बाजूनं कौल? पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कुणाचं नाव पुढे या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी फर्स्टपोस्टनं नुकताच एक सर्वेक्षण केलं. या नॅशनल ट्रस्ट सर्व्हेनुसार पंतप्रधान म्हणून सर्वाधिक पसंती नरेंद्र मोदी यांच्या नावाला मिळाली आहे. देशाचे प्रश्न हाताळण्याबाबत कुठल्या राज्यांनी भाजपवर विश्वास दाखवला आहे आणि कुठल्या राज्यांनी काँग्रेसवर याचंही उत्तर या सर्वेक्षणातून मिळालं.

पंजाब, मेघालय आणि मिझोराम या तीन राज्यांनी काँग्रेसवर विश्वास दाखवला आहे. बाकी बहुतेक सगळी राज्यं मोदींच्या पक्षावर विश्वास दाखवत आहेत.

Loading...

भाजपवर विश्वास दाखवण्यामागे काय कारणं होती असं विचारल्यावर मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार, भाजप गरिबांसाठी काम करतं, देशाचा आर्थिक विकास, पक्षाची विचारसरणी, मोदींना पर्याय नाही या क्रमाने कारणं आली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 10:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...