मराठी बातम्या /बातम्या /देश /काँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश

काँग्रेस अहंकारी पक्ष, लोकसभेसाठी आघाडी नाही - अखिलेश

'मोठा पक्ष असल्याचा काँग्रेसला अहंकार आहे. त्यांना प्रादेशिक पक्षच नको आहेत. अशा स्थितीत काँग्रेसशी आघाडी होऊ शकत नाही.'

'मोठा पक्ष असल्याचा काँग्रेसला अहंकार आहे. त्यांना प्रादेशिक पक्षच नको आहेत. अशा स्थितीत काँग्रेसशी आघाडी होऊ शकत नाही.'

'मोठा पक्ष असल्याचा काँग्रेसला अहंकार आहे. त्यांना प्रादेशिक पक्षच नको आहेत. अशा स्थितीत काँग्रेसशी आघाडी होऊ शकत नाही.'

  भोपाळ, ता.20 नोव्हेंबर : काँग्रेस हा अहंकारी पक्ष असून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाशी कुठलीही आघाडी करणार नाही असं उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश सिंग यांनी आज जाहीर केलं. भोपाळमध्ये प्रचारासाठी आले असताना ते NEWS18 शी बोलत होते. अखिलेश सिंग यांच्या या घोषणेमुळं महाआघाडीचे तिनतेरा वाजल्याचं स्पष्ट झालंय.

  काँग्रेसवर टीका करताना अखिलेश म्हणाले, मोठा पक्ष असल्याचा काँग्रेसला अहंकार आहे. त्यांना प्रादेशिक पक्षच नको आहेत. अशा स्थितीत काँग्रेसशी आघाडी होऊ शकत नाही. आम्ही उत्तर प्रदेशात स्वबळावर निवडणूक लढवू. या आधी बसपाच्या प्रमुख मायावती यांनीही काँग्रेससोबत जाणार नसल्याचं जाहीर केलं होतं.

  लोकसभेत सर्वात जास्त 80 जागा या उत्तर प्रदेशात आहेत. जो पक्ष उत्तर प्रदेशात चांगली कामगिरी करतो तो दिल्लीवर राज्य करतो असं म्हटलं जातं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत तब्बल 71 जागा जिंकल्या होत्या. काही पोटनिवडणुकीत काँग्रेस, समाजवादी आणि बसपाने एकत्र निवडणुक लढवत भाजपलं नमवलं होतं. त्याची देशभर चर्चाही झाली होती.

  सर्वपक्ष एकत्र आले तर भाजपला हरवलं जावू शकतं हे दिसल्यानं काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथविधी समारंभाला झाडून सर्व विरोधपक्षनेचे उपस्थित होते. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. विरोधकांमध्येच फाटाफूट झाल्याने भाजपला मोठा दिलासा मिळालाय.

   

   

  केजरीवालांवर असा झाला हल्ला, समोर आला हा VIDEO

  First published:
  top videos

   Tags: Akhilesh yadav, Congress, Loksabha election2019, Rahul gandhi, Uttar pradesh