अयोध्येतील दहशतवादी हल्ल्याचा निकाल; बंदोबस्तात वाढ

अयोध्येतील दहशतवादी हल्ल्याचा निकाल; बंदोबस्तात वाढ

2005मध्ये अयोध्येतील बॉम्बस्फोट प्रकरणी आज सुनावणी होणार आहे.

  • Share this:

अयोध्या, 18 जून : अयोध्यामध्ये 2005मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी इलाहाबाद कोर्टात आज सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर सुरक्षाव्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणात सध्या चार आरोपी जेरबंद आहेत. दरम्यान, सुनावणीच्या वेळी प्रयागराजसह उत्तर प्रदेशमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. न्यायमूर्ती दिनेश चंद्र यांच्यासमोर 11 जून रोजी या प्रकरणाचा युक्तिवाद पार पडला. लष्कर ए तोयबानं केलेल्या हलल्यामध्ये टुरिस्ट गाईडसोबत 7 जणांचा मृत्यू झाला होता. तर, पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये 5 दहशतवादी ठार झाले होते. तर, सीआरपीएफचे 7 जवान गंभीर जखमी झाले होते.

14 वर्षापूर्वी अटक

ठार केलेल्या दहशतवाद्यांकडून मोबाईल सिम आणि इतर वस्तु जप्त करण्यात आल्या होत्या. यामध्ये 5 जणांच्या नावाचा देखील खुलासा झाला होता. समोर आलेल्या नावापैकी सर्व आरोपींनी एकत्र येत बॉम्बस्फोटाचा कट रचला होता. शिवाय, त्यासाठी लागणारी शस्त्रास्त्र देखील जप्त केली होती.

यापूर्वी झाली सुनावणी

5 जुलै 2005मध्ये झालेल्या अयोध्येतील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी नैनीमधील विशेष न्यायालयात सुनावणी झाली होती. वर्ष 2006मध्ये फैजाबादमधून इलाहाबाद जिल्हा न्यायालयातून या खटल्याची सुनावणी सुरक्षेच्या कारणास्तव नैनी सेंट्र जेलमध्ये झाली होती. त्यामुळे आत आजच्या सुनावणीकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

VIDEO : नवी मुंबईत शाळेजवळ आढळली बाँब सदृश वस्तू

First published: June 18, 2019, 8:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading