राम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी

राम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी

जोंशींचं हे वक्तव्य म्हणजे नरेंद्र मोदी सरकारवरची नाराजी असल्याचं बोललं जातंय.

  • Share this:

प्रयागराज 18 जानेवारी : राम मंदिराच्या निर्मितीसाठी अजुन थोडी वाट पाहावी लागेल. मंदिराचं काम 2025 मध्ये सुरू होईल असं मत संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केलंय. प्रयागराज इथ सुरू असलेल्या कुंभमेळ्यात विंश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारने या कामात पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. जोंशींचं हे वक्तव्य म्हणजे नरेंद्र मोदी सरकारवरची नाराजी असल्याचं बोललं जातंय.

भैय्याजी जोशी म्हणाले, " 2024 नंतर राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल. राम मंदिराचं बांधकाम लवकरात लवकर सुरू व्हावं अशी कोट्यवधी हिंदूंची इच्छा आहे." ते पुढं म्हणाले 1952 मध्ये सोमनाथ मंदिराच्या बांधकामानंतर देशाने खूप प्रगती केली. राम मंदिराच्या निर्मितीनंतरही देश आणखी वेगाने प्रगती करेल.

जोशी यांच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण झालाय. जोशी यांनी 2025 नंतर मंदिर बांधकाम सुरू होईल असं म्हटलं असल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर स्पष्टीकरण देत जोशींनी आपण 2025 पर्यंत राम मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल असं म्हटल्याचं स्पष्ट केलं. जोशी यांनी अप्रत्यक्षपणे सरकारवर नाराजीही व्यक्त केली. या आधी सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मंदिरातं बांधकाम लवकरात लवकरत सुरू करा असं म्हटलं होतं.

काय म्हणाले होते भागवत?

अयोध्येत लवकरच राम मंदिराच्या उभारणीच्या कामाला सुरुवात होईल असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरासंदर्भात जे वक्तव्य केले आहे ते सकारात्मकच आहे असेही भागवत म्हणाले. नागपूरात एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर होणार नाही असे कुठले म्हंटले नाही फक्त न्यायालयीन प्रक्रियेनंतर होईल असे ते म्हणाले असेही भागवत यांनी सांगितलं.

आम्हाला राम मंदिर हवेच आहे राम मंदीरासाठी सरकारने संसदेत विधेयक आणून कायदा करावा किंवा राष्ट्रपतींद्वारे अध्यादेश काढून राम मंदीराचे निर्माण कार्य सुरु करावं असं मतही भागवत यांनी व्यक्त केलं.

First published: January 18, 2019, 2:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading