काय होता अलाहाबाद न्यायालयाचा निकाल ज्यावर सुप्रीम कोर्टात धावले सर्व पक्षकार?

काय होता अलाहाबाद न्यायालयाचा निकाल ज्यावर सुप्रीम कोर्टात धावले सर्व पक्षकार?

अयोध्या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2010 मध्ये निकाल दिला होता. या निकालाविरुद्ध तीनही पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

  • Share this:

मुंबई, 09 नोव्हेंबर : अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज ऐॅतिहासिक निर्णय देण्यात येणार आहे. 40 दिवस चाललेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने 16 ऑक्टोबरला निर्णय राखून ठेवला होता. याआधी या प्रकरणावर इलाहाबाद उच्च न्यायालयाने 2010 मध्ये निर्णय दिला होता. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने अयोध्येतील वादग्रस्त जागा ही राम जन्मभूमी असल्याचा निकाल 30 सप्टेंबर 2010 मध्ये दिला होता. उच्च न्यायालयाने वादग्रस्त 2.77 एकर जमीनीची वाटणी केली होती. यातील सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलला यांच्यात जमीनीचे समान वाटप करण्याचे आदेश दिले होते.

अयोध्या प्रकरणाशी संबंधित तीनही पक्ष निर्मोही आखाडा, सुन्नी वक्फ बोर्ड आणि रामलला यांनी अलाहाबाद न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयात 14 याचिका दाखल करण्यात आल्या. गेल्या 9 वर्षांपासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होते.

सर्वोच्च न्यायालयात 6 ऑगस्टपासून दररोज सुनावणी सुरू होती. ही सुनावणी प्रक्रिया 40 दिवसांनी 16 ऑक्टोबरला संपली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीस रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने निर्णय राखून ठेवला होता.

अयोध्या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशासह देशभर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अयोध्येत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. याशिवाय जवळपास 4 हजार जवानांची फौज अयोध्येत दाखल झाली आहे. राज्यातील सर्व संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे लक्ष देण्यात आलं आहे.

VIDEO : काय आहे अयोध्येचा वाद? जाणून घ्या थोडक्यात

First published: November 9, 2019, 10:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading