मोदी-शहा कौरव तर राहुल गांधी श्रीकृष्ण,काँग्रेसच्या नेत्याची पोस्टरबाजी

मोदी-शहा कौरव तर राहुल गांधी श्रीकृष्ण,काँग्रेसच्या नेत्याची पोस्टरबाजी

अलाहाबादमध्ये काँग्रेसने नेत्यांनी एक पोस्टर प्रसिद्ध करून मोदी-शहांना कौरवाच्या भूमिकेत उभं केलंय.

  • Share this:

10 फेब्रुवारी : लोकसभेत काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा देशभरात पडसाद उमटले. अलाहाबादमध्ये काँग्रेसने नेत्यांनी एक पोस्टर प्रसिद्ध करून मोदी-शहांना कौरवाच्या भूमिकेत उभं केलंय.

अलाहाबादमध्ये स्थानिक काँग्रेस नेते हसीब अहमदने एक पोस्टर लावलंय. या पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी थेट कौरवांशी तुलना केलीये. तर लालकृष्ण अडवाणी यांना धृतराष्ट्राच्या भूमिकेत दाखवलंय.

विशेष म्हणजे, आपल्याच पक्षाच्या खासदार रेणुका चौधरी यांची तुलना द्रौपदीशी करण्यात आलीये. तर राहुल गांधी यांची तुलना श्रीकृष्णाशी केलीये.

य़ा पोस्टरमध्ये  'रक्षमाम् राहुल गांधी' लिहुन महिलांचा अपमान केला म्हणून माफी मागण्यात आलीये. तसंच या पोस्टरमध्ये सोनिया गांधी, प्रियांका गांधींसह वरिष्ठ नेते प्रमोद तिवारी यांनाही दाखवण्यात आलं. .

"एक स्त्री की हंसी दुर्योधन को खल गई थी. याद करो सौ कौरवों की चिता जल गई थी" असा संदेशही या पोस्टरवर लिहिण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2018 09:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading