राजन्मभूमीत दहशतवादी हल्ला; 14 वर्षानंतर चौघांना जन्मठेप!

राजन्मभूमीत दहशतवादी हल्ला; 14 वर्षानंतर चौघांना जन्मठेप!

उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथील राम जन्मभूमी परिसरात 2005मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अलाहाबाद येथील विशेष टायल कोर्टाने मंगळवारी 4 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

  • Share this:

अयोध्या, 18 जून: उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथील राम जन्मभूमी परिसरात 2005मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी प्रयागराज येथील विशेष टायल कोर्टाने मंगळवारी 4 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पाचव्या आरोपीला कोर्टाने पुराव्याच्या आभावी निर्दोष सोडले. विशेष न्यायालयाचे न्यायाधिश दिनेश चंद्र यांनी या 4 आरोपींना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजसह राज्यातील अनेक जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.

अयोध्या येथे 2005मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निकाल आज जाहीर झाला. न्यायाधिश दिनेश चंद्र यांनी दोन्ही पक्षाचा बाजू ऐकल्यानंतर 11 जून रोजी निर्णय राखून ठेवला होता. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने केलेल्या या हल्ल्यात पर्यटक गाइड रमेश चंद्र पांडेय आणि शांती देवी यांच्यासह 7 जणांचा मृत्यू झाला होता. या 7 जणांमध्ये 5 दहशतवाद्यांचा देखील समावेश आहे. हल्ल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्यांना ठार करण्यात आले होते. कारवाई दरम्यान सीआरपीएफ आणि पीएसीचे 7 जवान गंभीर जखमी झाले होते.

14 वर्षापूर्वी झाली होती अटक

या हल्ल्यात ठार झालेला दहशतवाद्याकडून सापडलेल्या सिमकार्डमधून आसिफ इकबाल ऊर्फ फारूक, मो.शकील, मो.अजीज आणि मो.नसीम यांची नावे समोर आली होती. या सर्वांना 28 जुलै 2005 रोजी अटक करण्यात आली होती. या चार जणांचा आणखी एक साधीदार होता इरफान त्याला 22 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. या सर्वांनी मिळून हल्ल्याचा कट रचला होता आणि शस्त्रे जमा केली होती.


VIDEO : हे तर धनंजय मुंडेंचं अज्ञान, चंद्रकांत पाटील भडकलेबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 18, 2019 05:09 PM IST

ताज्या बातम्या