पळून जाऊन लग्न केल्यामुळे गावातल्या सगळ्या मुलींना जीन्स आणि फोन वापरण्याची बंदी!

देशात सध्या कोणतीही मुलगी सुरक्षित नाही आहे. पण या अत्याचारांसाठी मुलींना जबाबदार ठरवण्यात येत आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 19, 2018 10:23 AM IST

पळून जाऊन लग्न केल्यामुळे गावातल्या सगळ्या मुलींना जीन्स आणि फोन वापरण्याची बंदी!

19 एप्रिल : देशात सध्या कोणतीही मुलगी सुरक्षित नाही आहे. पण या अत्याचारांसाठी मुलींनाच जबाबदार ठरवण्यात येत आहे. आपल्या देशात मुलींवर आजही किती बंधनं आहेत, त्यांना कोणत्या दिव्यातून जावं लागतं, त्याचं एक ताजं उदाहरण हरियाणात पहायला मिळतं. गावातली 2 ते 3 जोडपी लग्नासाठी पळून गेल्यामुळे, गावातल्या मुलींवर जीन्स आणि फोन वापरण्याची बंदी घालण्यात आली आहे.

हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात इशापूर खेरी नावाचं 'दिव्य' गाव आहे. तिथल्या ग्रामपंचायतीनं हा मागास आणि प्रतिगामी नियम बनवला आहे. गेल्या वर्षीही असाच नियम बनवण्यात आला होता. आता त्याची पुन्हा अंमलबजावणी होतेय. पण सहाजिकच, तिथल्या मुलींना हे मान्य नाहीये. अर्थात हे मान्य असण्यासाठी त्यांची चुकी तर काय असा प्रश्नच आहे.

आम्ही काय घालयाचं आणि कुणाला फोन करायचा आणि कोणाला नाही, हे कुणीच ठरवू शकत नाही. तो आमचा निर्णय आहे, अशी या मुलींची भावना आहे. पण ग्रामपंचायत आपल्या या निर्णयावर खूश आहे. यामुळे मुलींची प्रेमप्रकरणं कमी झालीयेत, असा अजब आणि हास्यास्पद दावा पंचायतीनं केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2018 07:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close