पंतप्रधान मोदींनी वापरले 14 लाखांचे जॅकेट, काँग्रेसचा आक्षेप

पंतप्रधान मोदींनी वापरले 14 लाखांचे जॅकेट, काँग्रेसचा आक्षेप

  • Share this:

नवी दिल्ली, 02 मे : 15 लाखांचा सूट घातल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी एका जॅकेटमुळे चर्चेत आहे. काँग्रेसने या जॅकेटवरून मोदींवर निशाणा साधलाय. मोदींनी घातलेलं हे जॅकेट 17 हजार युरो म्हणजेत जवळपास 14 लाख रुपयांचं लोरो पियाना ब्रँडचं जॅकेट आहे. पंतप्रधान मोदींनी अलीकडेच परदेश दौऱ्यात हे जॅकेट परिधान केलं होतं.

लोरी पियाना का आहे लोकप्रिय ?

लोरो पियानाही 19 व्या शतकापासून लोकरीचे कपडे तयार करणारी एकमेव कंपनी आहे. या कंपनीचे जॅकेट हे जवळपास 28 लाख रुपयांपर्यंत आहे. इटलीची ही कंपनी महागडे जॅकेट बनवण्यात जगभरात लोकप्रिय आहे. या कंपनीचे जॅकेट अँजेलिना जोली आणि सेलीना गोमेज सुद्धा लोरो पियाना जॅकेट वापरतात. खरंतर ही कंपनी उच्च दर्जाचे लोकर आणि लेदर जॅकेट तयार करते. त्यामुळे लोरो पियाना जॅकेट खरेदी करणे सर्व सामान्यांची गोष्ट नाही.

ही कंपनी जे लोकर वापरते त्याची 2008 मध्ये 1 किलोची किंमतही जवळपास 35 हजार रुपये होती. जुलै महिन्यात या कंपनीने लग्झरी वस्तू बनवणारी फ्रांसची एलवीएमएच कंपनी विकत घेतली. पण तरीसुद्धा लोरो पियाना दर्जा कायम राहिला.

ही कंपनी काश्मिरी बकरी, मेरिनो आणि ऐंडियन विकुना या मेंढ्यापासून निघाणाऱ्या लोकरापासून जॅकेट तयार करते. आज जगभरातील महागड्या वस्तूमध्ये लोरो लियानाचा सहभाग आहे.

जगातील कोणते नेते वापरतात महागडे कपडे ?

डोनाॅल्ड ट्रॅम्प

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाॅल्ड ट्रम्प यांचा सूट ब्रियोनी नावाचा ब्रँड तयार करते. ब्रियोनी ही एकमेव लेबल सूट ब्रँड आहे. कपड्याच्या पसंतीवर 4 लाखांपासून ते 12 लाखांपर्यंत या ब्रँडचे सूट मिळतात.

ब्लादिमिर पुतीन:

पुतीन याचे सूटही ब्रियोनी किंवा कीटोन ब्रँडचे असतात. पुतीन यांचा एक सूट हा कमीत कमी 7 ते 8 लाखांचा असतो.

थेरेसा मे:

ब्रिटनचे पंतप्रधान थेरेसा मे यांची चामड्याची पँट चर्चेत असते. त्यांच्या चामडाच्या पँटची किंमत जवळपास दीड लाख इतकी आहे.     

डेव्हिड कॅमरून:

डेव्हिड कॅमरून हे रिचर्ड जेम्सचं बेस्पाक सूट  वापरतात. याची किंमत जवळपास 4 लाख इतकी आहे.  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2018 06:23 PM IST

ताज्या बातम्या